वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ॲपल कंपनीचे काही आयफोन्स सरकारी पातळीवरून हॅक होत असल्याचा अलर्ट कंपनीने दिला असल्याचा दावा राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी केला. मात्र हा दावा केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. देशातील नेत्यांच्या आयफोनचे हॅकिंग आणि ॲपल कंपनीचा दावा या संदर्भातली वस्तुस्थिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत देशासमोर ठेवली. Apple company hacking alert in 150 countries
ॲपल कंपनीने भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच नव्हे, तर तब्बल 150 देशांमध्ये हॅकिंगचा अलर्ट पाठवला आहे. पण या देशात स्वतःहून “सक्तीचे विरोधक” बनलेल्यांनी सकाळी उठल्यावर मोदी सरकारवर टीका करण्याचाच मक्ता घेतला आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा हातात असो किंवा नसो, ते टीकाच करत राहतात आणि कुठलाही मुद्दा सापडला नाही की सरकारवर हेरगिरीचा आरोप करतात, असे शरसंधान अश्विनी कुमार वैष्णव यांनी साधले.
तुमचा आयफोन सरकारी यंत्रणेकडून हॅक होतो आहे, अशा आशयाचा अलर्ट तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा, खासदार शशी थरूर यांच्या आयफोनवर आला. त्यांनी ट्विटरवर त्याचे स्क्रीन शॉट शेअर करत मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप करून आपला आयफोन सरकारला सरेंडर करण्याची पेशकश केली. पेगासस हेरगिरीचा मुद्दा देखील त्यांनी पुन्हा उपस्थित केला.
या सर्व आरोपांवर अश्विनी कुमार वैष्णव यांनी स्पष्ट खुलासा केला. ॲपल कंपनीने तब्बल 150 देशांमध्ये अलर्ट दिला आहे. ॲपल कंपनीच्या आयफोनचे एन्क्राइप्टर कोणी हॅक करू शकत नाही, असा कंपनीचाच दावा आहे पण तरी देखील आयफोन हॅक झाल्याचा अलर्ट कंपनीने दिला, तो देखील 150 देशांमध्ये दिला. कंपनीच्या ईमेलमध्ये त्याचा खुलासा आहे, असे अश्विनी कुमार वैष्णव यांनी स्पष्ट केले.
Apple company hacking alert in 150 countries
महत्वाच्या बातम्या
- Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!
- मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय
- बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक
- अमृता खानविलकरची ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण!