वृत्तसंस्था
बांदीपोरा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका सामान्य नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. हे प्रकरण खोऱ्यातील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील सदुनारा भागाशी संबंधित आहे.Another Target Killing in Kashmir Bihar’s Mohammed Amaraj fired by terrorists in Bandipora
दहशतवाद्यांनी गुरुवारी एका बिगर स्थानिक मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. रात्री 12.30 च्या सुमारास अतिरेक्यांनी या मजुरावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर मजुराला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मद जलील असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे.
सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला
बांदीपोरामध्ये स्थानिक नसलेल्या नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील अजस तहसीलमधील सदुनारा गावात ही घटना घडली. 19 वर्षीय मोहम्मद अमरेज असे या मजुराचे नाव आहे. अमरेज हा मधेपुरा जिल्ह्यातील बेसड गावचा रहिवासी होता. तो बिहारहून येथे कामासाठी आला होता.
दहशतवाद्यांचा गैर-काश्मिरी लोकांना इशारा
खोऱ्यात गैर-काश्मिरींवर दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी एका गैर-काश्मीरी व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्यांना खोऱ्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे बिगर काश्मिरी लोकांची हत्या करून दहशतवादी तेथे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक नसलेल्या नागरिकांमध्ये घबराट
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या या घटनांमुळे सरकारी कर्मचारी आणि तिथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून घाटीत अशा टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खोऱ्यातील बिगर काश्मिरी लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे या लोकांचे पलायनही तेथून सुरू झाले होते.
Another Target Killing in Kashmir Bihar’s Mohammed Amaraj fired by terrorists in Bandipora
महत्वाच्या बातम्या
- ADRचा अहवाल : महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 11 मंत्री पदवी, पदव्युत्तर पदवीधारक
- ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का : निकटवर्तीय अणुव्रत मंडल यांना अटक, 8 आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स
- फ्री ऑफरवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण : खिरापत वाटण्याचे आश्वासन अन् कल्याणकारी योजना या दोन वेगवेगळ्या बाबी
- Azadi Ka Amrit Mahostav : नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महाराष्ट्र यांचे अनोखे नाते!!