काँग्रेस एका धक्क्यातून सावरत नाही तोच दुसरा मोठा दणका बसला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला दणका देत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती न करण्याचे जाहीर केले. ममता बॅनर्जींच्या निर्णयानंतर इंडिया आघाडीच्या झालेल्या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असताना मान यांनी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिला.Another big blow to India front After Mamata Banerjee now Bhagwant Maan take big decision
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्या म्हणाले की, तृणमूलने दिलेली जागावाटपाची ऑफर काँग्रेसने नाकारली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेने काल पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केल्याची माहितीही मला देण्यात आली नव्हती.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या मुद्द्यावर बोलताना पश्चिम बंगालसाठी जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. “ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पनाही करता येत नाही. राहुल गांधी यांनीही काल तेच सांगितले. ममता बॅनर्जी या आघाडीच्या प्रमुख नेत्या आहेत.”
तर आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, “ममता बॅनर्जींची टीएमसी बंगालमधील सर्वात मोठी पक्ष आहे. काँग्रेस आणि डावे टीएमसीच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा असला तरी लवकरच सर्व प्रश्न सुटतील. ‘इंडिया’ आघाडी एकत्र निवडणुका लढवणार आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान म्हणाले की, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही. ‘आप’ सर्व 13 जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.
Another big blow to India front After Mamata Banerjee now Bhagwant Maan take big decision
महत्वाच्या बातम्या
- CISFच्या हाती संसदेची सुरक्षा; बजेट सेशनपूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना यंत्रणा समजावी म्हणून दिली जबाबदारी
- देशात राम भक्तीची लाट वगैरे काही नाही; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची दर्पोक्ती!!
- न्यू हॅम्पशायर निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निक्की हेली यांचा पराभव; रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढे
- बाबरी मशिदीचे मुख्य पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी म्हणाले- भाजपनेच राम मंदिराचा मुद्दा संपवला!