आरोपी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रहिवासी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी सहावा आरोपी महेश कुमावत याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. तो देखील या संपूर्ण कटाचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.Another accused in the Parliament security breach case was caught by the police now six people have been arrested
काही तासांच्या चौकशीनंतर महेशला अटक करण्यात आली. आरोपी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रहिवासी असून १३ डिसेंबरला घटनेच्या दिवशी तो दिल्लीतही आला होता.
संसद भवनात मोठ्या प्रमाणात सुरक्षा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांवर दहशतवाद विरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. संसद भवनात घुसखोरी करणाऱ्या तरूणांनी बुटामध्ये लपवून स्मोक कँडल आणल्या होत्या. फवारणी होताच सभागृहात पिवळा धूर पसरू लागला. यानंतर खासदारांनी त्या तरुणांना पकडून बेदम चोप दिला.
संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संसद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
Another accused in the Parliament security breach case was caught by the police now six people have been arrested
महत्वाच्या बातम्या
- छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज साहूनी तोंड उघडले; “हात” वर करून मोकळे झाले, पण…
- अयोध्येत 22 जानेवारीच्या राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भाजपचे मतदारांसाठी अयोध्या यात्रांचे भव्य आयोजन!!
- विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!!
- Good news! आता ‘या’ देशात जाण्यासाठी भारतीयांना गरजेचा नसेल ‘Visa’