• Download App
    Anna Hazare Unhappy With 'Anna Ata Tari Utha' Flex in Pune पुण्यातील 'अण्णा आता तरी उठा' फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी

    Anna Hazare : पुण्यातील ‘अण्णा आता तरी उठा’ फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची

    Anna Hazare

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Anna Hazare काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.Anna Hazare

    काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर देशभरात विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पाषाण परिसरात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्समध्ये, अण्णांना देशातील सध्याच्या परिस्थितीवर, विशेषतः मतांची चोरी, भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीवर बोलण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Anna Hazare



    नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?

    मी दहा कायदे आणले, मात्र 90 वर्षानंतर देखील मी करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे केलं ते आपण करावे असे तरुण युवकांना वाटले पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर आपले काही कर्तव्य आहे की नाही, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी देशातील तरुणांना खडसावले.

    ते पुढे म्हणाले, काल स्वतंत्र दिवस साजरा केला, नुसता तिरंगा हातात घेऊन, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही. मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येते अण्णांनी जाग झाले पाहिजे तेव्हा वाईट वाटते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

    फ्लेक्सवरील मजकूर काय आहे?

    पुण्यातील पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर लावले होते. राहुल गांधींच्या आरोपानंतर, निवडणुकांमध्ये मतांची चोरी होत असल्याचा दावा करत, अण्णांनी यावर प्रतिक्रिया द्यावी किंवा आंदोलन करावे, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली होती.

    देशात मतांची चोरी होत असताना,
    देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,
    देशात हुकूमशाही माजलेली असताना,
    देशाची लोकशाही धोक्यात असताना.
    अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
    अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे. असा मजकूर बॅनरवर होता.

    राहुल गांधींकडून मतचोरीचा आरोप

    दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांतील गोंधळ, बोगस मतदान आणि ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. भाजप सरकार आणि आयोगाने मिळून मतांची चोरी केली केल्याचा त्यांचा आरोप आहे. या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर उतरले असून देशभरात संघर्षाचे वातावरण आहे. शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी “निवडणुकांपूर्वी दोन व्यक्ती भेटले होते” असा उल्लेख करून संभ्रम निर्माण केला होता. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अण्णा हजारेंनी आता सरकारविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी बॅनरमधून करण्यात आली.

    Anna Hazare Unhappy With ‘Anna Ata Tari Utha’ Flex in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    Vice Presidential election : लाल संविधान, उभी दांडी, मलेशियातून केली खेळी; तरी विरोधकांची मते फुटली!!

    Elite Force : भारत तयार करणार अमेरिका – इस्रायलप्रमाणे विशेष एलिट फोर्स; शत्रूच्या घरात घुसून करणार कारवाई