जन सुराज पक्षाच्या निवडणूक बैठकीत गोंधळ
विशेष प्रतिनिधी
मुझफ्फरपूर : Prashant Kishor बिहारच्या राजकीय पटलावर दाखल झालेल्या जन सुराज या नव्या पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर त्यांच्या सभेत एक कार्यकर्ता सतत बोलत असताना संतापले. प्रशांत किशोर त्यांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तो बसायला तयार नव्हता. यावर प्रशांत किशोर म्हणाले की, पक्षाला राजद बनवायचे नाही.Prashant Kishor
तिरहुत पदवीधर मतदारसंघातील एमएलसी उमेदवार डॉ. विनायक गौतम यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रशांत किशोर मुझफ्फरपूरमधील चंद्रहाथी येथे पोहोचले होते. बैठकीत एका कार्यकर्त्याला माईक घेऊन आपले मत मांडायचे होते. प्रशांत किशोर त्यांना वारंवार बसण्यास सांगत होते, मात्र कार्यकर्ता प्रशांत किशोर यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हता. आजूबाजूचे लोक त्याला बसवण्याचा वारंवार प्रयत्न करत होते पण तो कोणाचेच ऐकत नव्हता. एकदा तर तो प्रशांत किशोर यांच्यासमोरही येवून उभा ठाकला.
सहसा शांत राहणारा प्रशांत किशोर त्याच्या या कृतीमुळे चांगलाच संतापले. त्यांनी त्याला खडसावले आणि सांगितले की हा काही राजद पक्ष नाही. मीटिंगमधून बाहेर पडा. शिस्त आहे की नाही. अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही. पक्षाला राजद बनवायचे नाही.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर रोजी ‘जन सुराज पार्टी’ या नावाने आपला राजकीय पक्ष स्थापन केला आहे. ते बिहारच्या राजकीय परिस्थितीत मोठे बदल घडवून आणतील अशी आशा आहे. प्रशांत किशोर यांनी मधुबनीमध्ये जन्मलेले माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी मनोज भारती यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मनोज भारती मार्चपर्यंत या पदावर राहणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका मार्चमध्ये होणार आहेत.