• Download App
    पाकिस्तानच्या बाजुने काश्मीर मुद्याच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या विरोधात संताप|Anger against Hyundai, which has sided with Pakistan on the Kashmir issue

    पाकिस्तानच्या बाजुने काश्मीर मुद्याच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या विरोधात संताप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ह्युंदाई पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पाकिस्तानचे काश्मीरच्या भूमिकेवर समर्थन केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान ह्युंदाईने ट्विट करत म्हटले आहे की, आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया. ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना आपण त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया.Anger against Hyundai, which has sided with Pakistan on the Kashmir issue

    या ट्विटमध्ये दाल सरोवरातील एका बोटीचे छायाचित्र आहे आणि त्यावर ‘काश्मीर’ हे नाव लिहून काटेरी तारेने जोडले गेल्याचं दाखवण्यात आले आहे.हे चित्र आणि हे ट्विट मोठ्या वादात सापडलं असून त्यानंतर ह्युंदाईवर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. बायकॉट ह्युंदाई असा ट्रेंडही होऊ लागला आहे.



    काश्मीर एकता दिवस म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी ही पोस्ट करण्यात आली आहे. भारताचा भूभाग असणाऱ्या काश्मीरचे खुलेआम विभाजन करण्याची मागणी करणारी ही पोस्ट ह्युंदाईने प्रसारित केली आहे.या ट्विटमधून एकप्रकारे भारताचा अपमान झाला असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

    भारतातील संतप्त नेटकºयांनी ह्युंदाईला या वादग्रस्त ट्विटबद्दल कळवले आणि तुम्ही या ट्विटचं समर्थन करता का? असा सवाल केला तेंव्हा त्यांनी ह्युंदाई इंडियाने त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना ब्लॉक करण्यास सुरुवात केली.

    त्यानंतर ह्युंदाईने भारतात एक स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की ह्युंदाई मोटर इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही राष्ट्रवादाच्या संदर्भात ठामपणे उभे आहोत. एका अवांछित सोशल मीडिया पोस्टमध्ये दाखवलेल्या लिंकमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

    भारत हे हुंदाईचे ब्रँडचे दुसरे घर आहे आणि असंवेदनशील संवादाबाबत आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि आम्ही अशा कोणत्याही विचारांचा तीव्र निषेध करतो. भारताप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही देशाच्या तसेच नागरिकांच्या भल्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू.

    Anger against Hyundai, which has sided with Pakistan on the Kashmir issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार