वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात आनंद शर्मा यांनी लिहिले की, 26 एप्रिल रोजी हिमाचल काँग्रेसच्या सुकाणू समितीचे प्रमुख बनले असूनही त्यांची भूमिका आजपर्यंत स्पष्ट करण्यात आलेली नाही.Anand Sharma Resigns After Ghulam Nabi, Anand Sharma has resigned from the post of Congress, this is the reason!
त्यांनी लिहिले की, यापूर्वी हिमाचल निवडणुकीसंदर्भात दिल्ली आणि शिमला येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकांमध्येही त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. या कारणांमुळे हिमाचल काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराला पाठिंबा देत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हिमाचल प्रदेशातील बड्या नेत्यांचा समावेश
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांची २६ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आनंद शर्मा हे हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठे नेते मानले जातात. पक्षाच्या कोणत्याही बैठकीला निमंत्रित न केल्याने आपला स्वाभिमान दुखावल्याचे त्यांनी पत्रात काँग्रेस अध्यक्षांना सांगितले आहे.
या वर्षाच्या अखेरीस निवडणुका
आनंद शर्मा यांनी 1982 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते अनेक वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले असून पक्षात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी आनंद शर्मा यांचा राजीनामा आला आहे. हिमाचलमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
गुलाम नबी आझाद यांनीही राजीनामा दिला
G-23 गटाचे आणखी एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद शर्मा यांचा राजीनामा आला आहे. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा हे दोघेही G-23 गटाचे प्रमुख नेते आहेत जे पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांवर टीका करत आहेत.
Anand Sharma Resigns After Ghulam Nabi, Anand Sharma has resigned from the post of Congress, this is the reason!
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक : मांसाहार करून मंदिरात गेल्याचा सिद्धरामय्या यांच्यावर आरोप, माजी मुख्यमंत्र्यांनी केला बचाव
- नोकरीची संधी : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्जाची शेवटची तारीख!!; असा करा अर्ज
- संपूर्ण जगासाठी भारताला ‘आदर्श समाज’ बनवण्यासाठी आरएसएस काम करत आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- शिंदेसेना Vs उद्धव सेना खटला : राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता