• Download App
    पाकिस्तानातून ३०० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रास्त्र तस्करांची बोट पकडली; 10 पाकिस्तान्यांना अटक An arms smuggler's boat with drugs worth 300 crores was caught from Pakistan

    पाकिस्तानातून ३०० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रास्त्र तस्करांची बोट पकडली; 10 पाकिस्तान्यांना अटक

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानमधून दारूगोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणारी बोट पकडली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. गुजरातमध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली. An arms smuggler’s boat with drugs worth 300 crores was caught from Pakistan

    कशी केली कारवाई? 

    या बोटीमध्ये 10 पाकिस्तानी घुसखोर नागरिक होते. बोटीच्या कॅप्टनसह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आयसीजीने या बोटीमधून दारूगोळा, हत्यारांसह 40 किलो ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची किंमत तब्बल 300 कोटी रुपये आहे.



    आयसीजीने सांगितले की, गुजरात पोलीस आणि कोस्ट गार्ड जवानांनी ही कारवाई 25 आणि 26 डिसेंबर रोजी केली. अरिंजय बोटीला पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय समुद्रात तैनात करण्यात आले होते.

    त्यानंतर मासेमारी करणाऱ्या सहेली नावाच्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेतले. त्या बोटीचा तपास केला असता त्यामुळे दारूगोळा, हत्यारे आणि 40 किलो ड्रग्ज आढळले. पाकिस्तानी बोटीसह सर्व सामान जप्त करण्यात आले.

    An arms smuggler’s boat with drugs worth 300 crores was caught from Pakistan

    महत्वाच्या बातम्या

     

    
    					

    Related posts

    Iran Army Chief : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणच्या लष्करप्रमुखांचा लष्करी कारवाईचा इशारा; म्हणाले- शत्रूंना प्रत्युत्तर देऊ

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही