• Download App
    36 दिवसांनंतर सापडल खलिस्तान समर्थक अमृतपाल, पंजाबमधील मोगा गुरुद्वारातून पोलिसांनी घेतले ताब्यात|Amritpal, a pro-Khalistan supporter found after 36 days, was taken into custody by the police from Moga Gurdwara in Punjab

    36 दिवसांनंतर सापडल खलिस्तान समर्थक अमृतपाल, पंजाबमधील मोगा गुरुद्वारातून पोलिसांनी घेतले ताब्यात

    वृत्तसंस्था

    चंदीगड : एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब दे वारीसचा चीफ आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (अमृतपाल सिंग) याला पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेतले आहे. अमृतपालला तब्बल 36 दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी (21 एप्रिल) थांबवण्यात आले.Amritpal, a pro-Khalistan supporter found after 36 days, was taken into custody by the police from Moga Gurdwara in Punjab

    वास्तविक, अमृतसरच्या सर्व साथीदारांना आधीच अटक करण्यात आली होती. त्याच्या साथीदारांची सतत चौकशी सुरू होती. पोलिसांनी पत्नीवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतरच तोही ताब्यात आल्याचे समजते. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते. तो फरार असताना त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा व्हिडिओ प्रसिद्ध केले होते.



    18 मार्चपासून फरार होता अमृतपाल

    सर्वप्रथम, 18 मार्च रोजी पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली मात्र अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते, मात्र तो सतत वेश बदलून पोलिसांपासून पळून जात होता.

    Amritpal, a pro-Khalistan supporter found after 36 days, was taken into custody by the police from Moga Gurdwara in Punjab

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते