चंडीगड – पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही असे सांगत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी पुन्हा काँग्रेस हायकमांडवर टीका केली आहे.पक्षांतर्गत वादामुळे अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.Amrindar singh targets Rahul Gandhi
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी सिद्धू यांच्याविरोधात लढायला तयार आहोत. या घातक माणसापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले असते तर मी आधीच राजीनामा दिला असता. मी स्वतः एक माजी सैनिक आहे त्यामुळे युद्ध कसे लढायचे हे मला चांगलेच ठावूक आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपण मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी तयार आहोत. तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा असे आपण सोनिया गांधी यांना सांगितले होते. माझ्या म्हणण्याप्रमाणेच काही घडले नसल्याने आता मी लढायला सज्ज झालो आहे. मला न सांगताच काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविण्यात आल्याने अपमान झाल्यासारखे वाटले.’’
Amrindar singh targets Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- ग्राहकांना दिलासा ! मोदी सरकारचा मोठा निर्णय : सीम कार्ड घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही
- शंभर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या लखोबा लोखंडेला पिंपरी- चिंचवडमध्ये अखेर अटक
- प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास करु नका उशीर, अन्यथा भरावा लागेल दंड ; ३१ डिसेंबर शेवटची तारीख
- कोविशील्डच्या पहिल्या डोसला परवानगी देण्याविरोधात केंद्राने केले अपील
- महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले, गॅस परवडेना, चुलीवरचा स्वयंपाकही जमेना; रायगड येथील महिला संतापल्या