पीएफआयवर बंदी घालून आम्ही कर्नाटक सुरक्षित केले आहे, असेही ठणकावून सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी खरगेंच्या या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानाचा जाहीरपणे समाचार घेतला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. Amit Shahs reply to Congress on Mallikarjun Kharges objectionable statement about PM Modi
कर्नाटकातील निवडणूक रॅलीत काँग्रेसवर निशाणा साधताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “ज्या पंतप्रधान मोदींचा संपूर्ण जग आदर करते, त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विषारी साप म्हटले, सोनिया गांधी त्यांना मौत का सौदगार म्हणतात. काँग्रेसच्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते जितके मोदीजींना शिव्या देतील, तितके कमळ फुलेल.”
अमित शाह पीएफआयवर काय म्हणाले? –
भाजप नेते अमित शाह म्हणाले, “काँग्रेसने माझ्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. पीएफआयवर बंदी घालून आम्ही कर्नाटक सुरक्षित केले आहे. मी घाबरत नाही. तुमचा काही आक्षेप असेल तर या आणि पीएफआय का सुरू ठेवायचे ते सांगा.” मतपेटीच्या लालसेने काँग्रेसने पीएफआयला डोक्यावर घेतले होते.
याशिवाय, “काँग्रेस ७० वर्षांपासून कलम ३७० लहान मुलाप्रमाणे खेळवत होती. काँग्रेस, जेडीएस, सपा, बसपा, ममता सगळे म्हणायचे की ते हटवू नका, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. “कलम ३७० हटवले आहे, रक्ताच्या नद्या सोडा, कुणी दगड मारण्याचेही धाडस केले नाही.”
कर्नाटकात भाजपचेच सरकार स्थापन होणार –
अमित शाहा म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. खाली भाजपाचे सरकार, वर भाजपचे सरकार. डबल इंजिनचे मोदी सरकार कर्नाटकला पुढे नेईल. काँग्रेस आली तर कर्नाटकला पुन्हा रिव्हर्स गियरमध्ये टाकेल.”
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटकात एकूण ५,२१,७३,५७६ मतदार आहेत, तर ९.१७ लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. १ एप्रिल रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही मतदान करता येणार आहे. १०० बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
Amit Shahs reply to Congress on Mallikarjun Kharges objectionable statement about PM Modi
महत्वाच्या बातम्या
- गव्हाच्या बंपर खरेदीमुळे सरकारची चिंता मिटली; आतापर्यंत १९५ लाख टन खरेदी, गेल्या वर्षीचा विक्रम मोडला!
- पीएम मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर खरगेंची सारवासारव, म्हणाले- कोणी दुखावले असल्यास खेद व्यक्त करेन
- Delhi excise case : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून मोठा झटका! न्यायालयीन कोठडीत केली वाढ
- आणखी एक राजकीय भूकंपाची चाहुल, ठाकरे गटाचे सर्व 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात- उदय सामंत