• Download App
    अमित शाहांनी केला विरोधी पक्षांच्या जागांबाबत मोठा दावा, म्हणाले... Amit Shah made a big claim about the seats of the opposition parties

    अमित शाहांनी केला विरोधी पक्षांच्या जागांबाबत मोठा दावा, म्हणाले…

    भाजपने 5 टप्प्यात 310 जागांचा आकडा पार केला आहे, असंही अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. Amit Shah made a big claim about the seats of the opposition parties

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दावा केला की, राहुल गांधींचा पक्ष 40 चा आकडाही पार करू शकणार नाही. यादरम्यान अमित शाहा म्हणाले, अखिलेश यादव यांच्या सपा पक्षाला यूपीमध्ये 4 जागाही मिळवता येणार नाहीत.

    अमित शहा म्हणाले, सहा टप्प्यातील मतदान संपले आहे. पाच टप्प्यांची आकडेवारी समोर आली आहे. भाजपने 5 टप्प्यात 310 जागांचा आकडा पार केला आहे. सहावा टप्पा पूर्ण झाला आहे. सातवा टप्पा असणार आहे. आता तुम्हाला 400 चा आकडा पार करावा लागेल, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.



    4 जूनला पंतप्रधान मोदींचा विजय निश्चित असल्याचं शाहांचं म्हणणं आहे. भाजप आणि एनडीएचा विजय निश्चित आहे. शाह म्हणाले, 4 जूनला दुपारी राहुलबाबांचे लोक पत्रकार परिषद घेणार आहेत हे बघा. यानंतर ते म्हणू लागतील की ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. पराभवाचे खापर खर्गे साहेबांवरच पडणार आहे. तसेच, ते म्हणाले मला आज मायावती आणि अखिलेश यादव यांना विचारायचे आहे. कुशीनगर हे ‘शुगर बाऊल’ या नावाने प्रसिद्ध होते. पण तुमच्या काळात 5-6 साखर कारखाने बंद पडले आहेत. आमच्या सरकारच्या काळात 20 साखर कारखाने सुरू करण्याचे काम झाले.

    Amit Shah made a big claim about the seats of the opposition parties

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात

    Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते

    Sonam Wangchuk : सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटले-वांगचुक यांच्या जामिनावर विचार करा; त्यांची तब्येत ठीक नाही, तुरुंगात 5 महिने झाले