• Download App
    मर्यादित साधने असतानाही भारताने प्रभावीपणे हाताळली कोरोनास्थिती, देशातील ३५० जिल्ह्यात आपदा मित्र प्रकल्पाची अमित शहा यांची घोषणा|Amit Shah announces disaster relief project in 350 districts of India

    मर्यादित साधने असतानाही भारताने प्रभावीपणे हाताळली कोरोनास्थिती, देशातील ३५० जिल्ह्यात आपदा मित्र प्रकल्पाची अमित शहा यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताकडे मर्यादित साधने असतानाही देशात कोरोना महामारीची स्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळण्यात आली. त्यामुळेच कोणत्याही आपत्तीचा नागरिकांनी सर्वप्रथम प्रतिकार करावा, यासाठी देशभरातील 350 जिल्ह्यांमध्ये आपदा मित्र हा प्रकल्प राबवण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सांगितले.Amit Shah announces disaster relief project in 350 districts of India

    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या (एनडीएमए) सतराव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, मर्यादित साधने असतानाही 130 कोटींची विशाल लोकसंख्या असलेल्या देशात जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत प्रभावीपणे कोरोना महामारी हाताळण्यात आली.



    कोरोना महामारीच्या विरोधी लढ्यात देशाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे कोणत्याही तटस्थ संस्थेने मूल्यांकन केल्यास समोर येईल. या कामगिरीच्या आधारे देशात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आहे.

    कोरोना महामारीचा मुकाबला करणे कित्येक देशांना अवघड ठरले होते. एनडीएमएने केलेल्या उत्कृष्ट योजना आणि सज्जतेमुळे एकाही प्राणवायू प्रकल्पाचे नुकसान झाले नाही किंवा रुग्णालये आणि प्राणवायू प्रकल्पांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि अतिशय उत्कृष्ट अशी सज्जता केली आहे.

    देशातील 25 राज्यांमधील 30 जिल्ह्यांमध्ये आपदा मित्र योजनेच्या पथदर्शक प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेच्या राबवण्यात आलेल्या पथदर्शक प्रकल्पांमध्ये विमा कवच पुरवण्यात आले आहे. याबाबत 28 राज्यांसोबत करार करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले.

    Amit Shah announces disaster relief project in 350 districts of India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही