विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 21 दिवसांसाठी अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी अमित शाह हेच पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तवल्याने देशाच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली. ही खळबळ फक्त भाजप पुरतीच मर्यादित राहिली नाही, तर ती काँग्रेस प्रणित इंडी आघाडीत देखील उडाली. Amit Shah and J P Nadda confirmed Modi’s prime ministership
कारण केजरीवाल म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तरी, ते पुढच्या वर्षी रिटायर्ड होऊन अमित शाह यांना पंतप्रधान करतील. त्यावर अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असे ठणकावून सांगितले. पण या सगळ्यात राहुल गांधींचे काय होईल??, हा सवाल तयार झाला आणि त्याचे उत्तर मात्र या तिघांपैकी कोणीच दिले नाही.
अरविंद केजरीवालांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधताना नरेंद्र मोदी नव्हे, तर अमित शाह हे पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तविले. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित पंतप्रधान होतीलही पण ते पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होतील आणि त्यांनी स्वतःच बनवलेल्या नियमानुसार ते रिटायर्ड होतील. त्यानंतर ते आपल्या लाडक्या अमित शाह यांनाच पंतप्रधान करतील. त्यापूर्वी ते पुढच्या 2 महिन्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून दूर करतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर देशात नेमके कोण पंतप्रधान होणार??, याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, पण केजरीवालांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचीच नावे पंतप्रधान पदासाठी घेतली. इंडी आघाडीतले कुठलेच नाव त्यांनी पंतप्रधान पदासाठी घेतले नाही. त्यामुळे भाजपपेक्षा इंडी आघाडीत संभ्रम पसरला.
मात्र भाजपमधून स्वतः अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा संभ्रम लगेच दूर केला. मूळात 75 वर्षे वयाच्या नेत्याला रिटायर्ड करणे असे भाजपच्या संविधानात प्रावधानच नाही. त्यामुळे मोदी रिटायर्ड होण्याचा प्रश्नच नाही. पुढच्या 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी राहतील, असे अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्पष्ट केले. अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत मोदीच पंतप्रधान बनणार असल्याचे सांगितले, तर नड्डा यांनी ट्विट करून अमित शहा यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
पण या सगळ्यांमध्ये काँग्रेस मधून पंतप्रधान पदासाठी धडपड करणारे राहुल गांधींचे काय होईल??, या त्यांना न विचारलेल्या सवालाचे उत्तर केजरीवाल, अमित शाह किंवा जे. पी. नड्डा यांनी दिलेच नाही. किंवा त्यांनी स्वतंत्रपणे पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचे नावही घेतले नाही.
Amit Shah and J P Nadda confirmed Modi’s prime ministership
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्यावर आरोप निश्चित; दिल्ली न्यायालयात सुनावणी
- पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने
- ठाकरे + पवार + काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मशिदींमधून फतवे; राज ठाकरेंचा गंभीर इशारा!!
- निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारलं!