• Download App
    अमेठी बनले ऑक्सिजनच्या निर्मिती प्लांटचे हब, भाजपच्या खासदार स्मृती ईराणी यांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्यात तीन महिन्यात ७ ठिकाणी प्लांट सुरु|Amethi becomes oxygen plant hub, MP Smriti Irani's efforts ; Plants operating at 7 places in the district in just three months

    अमेठी बनले ऑक्सिजनच्या निर्मिती प्लांटचे हब, भाजपच्या खासदार स्मृती ईराणी यांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्यात तीन महिन्यात ७ ठिकाणी प्लांट सुरु

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्हा हा ऑक्सिजनच्या निर्मिती प्लांटचे हब बनले आहे. केवळ तीन महिन्यात हा कायापालट झाला आहे. खासदार स्मृती ईराणी आणि प्रशासनाने यांनी त्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.Amethi becomes oxygen plant hub, MP Smriti Irani’s efforts ; Plants operating at 7 places in the district in just three months

    जिल्ह्यात तीन माहिन्यांपूर्वी परिसरातील रुग्णालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. परंतु आता १ हजार बेड असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा आणि प्रति दिवशी दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर निर्माण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात जेथे ऑक्सिजनची गरज लागेल तेथे तो आता पुरवता येणार आहे. जिल्ह्यात विविध ७ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले आहेत.



    कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर अमेठी लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मृती ईराणी यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांना आता यश आले आहे. केवळ तीन महिन्यात हे प्लांट सुरु झाले आहेत.

    तीन महिन्यांपूर्वी एकही प्लांट नव्हता

    अमेठी जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी एकही ऑक्सिजन प्लांट नव्हता. त्या वेळी कोरोनाची दुसरी लाट सुरु होती. विविध रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा पाहायला मिळत होता. जगदीशपूर येथील नंदन गॅस एजन्सीतून ऑक्सिजनचे सिलेंडर भरून आणावे लागत होते. तसेच इतर ठिकाणावरून ऑक्सिजन मागवावा लागत होता.

    कोणी घेतला पुढाकार..

    राजेश मसाला, इंडोगल्फ, एसीसी सिमेंट टिकरिया, वेदांता समूह, शुगर मिल, बोईंग संस्था व पीएम केअर फंड यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्थापन केले आहेत.

    ऑक्सिजन प्लांट बाबत…

    •  अमेठी जिल्ह्यामध्ये ७ प्लांट कार्यरत
    •  तीन महिन्यांपूर्वी एकही प्लांट नव्हता
    • खासदार स्मृती ईराणी आणि प्रशासनाचे प्रयत्न
    • हजार बेडच्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा
    •  दिवसात दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती

    एक हजार बेडना ऑक्सिजन पुरविण्यास सुरुवात झाली आहे. ७ ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित झाले आहेत. त्याचा फायदा अमेठी जिल्हा आणि परिसरात होणार आहे. यातून सर्वसामान्य माणसाला तातडीची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्लांट उभारण्यासाठी ४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

    Amethi becomes oxygen plant hub, MP Smriti Irani’s efforts ; Plants operating at 7 places in the district in just three months

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य