• Download App
    आयटी इंजिनिअर बनले स्पेशल 26 दरोडेखोर, इन्कमटॅक्स ऑफिसर बनून सोनाराला लुटले|IT engineer become Special 26 robbers, robbed jeweller by becoming an income tax officer

    आयटी इंजिनिअर बनले स्पेशल 26 दरोडेखोर, इन्कमटॅक्स ऑफिसर बनून सोनाराला लुटले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : स्पेशल 26 च्या स्टाईलने इनकम टॅक्स ऑफिसर बनून सोनाराच्या लूटणाऱ्या टोळीत तीन आयटी इंजिनिअरचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे..
    सराफाचे अपहरण करून लाखोंची लूट करणाऱ्या आरोपींमध्ये तीन आयटी अभियंत्यांचा समावेश असून हा कट मित्रानेच आखल्याचे समोर आले आहे. पोलिसानी याप्रकरणी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.IT engineer become Special 26 robbers, robbed jeweller by becoming an income tax officer

    व्यास गुलाब यादव (वय ३४, रा. जांभुलवाडी, मूळ रा. बिहार), श्याम अच्युत तोरडमल (वय 21 रा. धनकवडी), किरण कुमार नायर (वय 31, रा. भोसरी),मारुती अशोक सोळंके (वय 30), अशोक जगन्नाथ सावंत (वय 31, दोघेही रा. माजलगाव, जिल्हा बीड), उमेश अरुण उबाळे (वय 24 रा. भोसरी), सुहास सुरेश थोरात (वय 32, रा. कराड), रोहित संभाजी पाटील (वय 23, रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.



    याप्रकरणी एका सराफ व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव आणि संबंधित सराफ दोघेही मित्र आहेत. यादवने तोरडमल यांच्यासोबत संगनमत करून हा कट रचला होता.

    आरोपींनी इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत अपहरण करून 20 लाख रुपये आणि 30 तोळे सोने लंपास केले होते. आरोपींना पोलिसांनी कोल्हापूर परिसरात गडहिंग्लज ते हमीदवाडा या दरम्यान सापळा रचून अटक केली आहे.

    भैय्यासाहेब मोरे, रोहित पाटील, श्याम तोरडमल हे आयटी अभियंता आहेत. तोरडमल हा मोबाईल ॲप कंपनीमध्ये कामाला आहे. व्यास, यादव आणि तोरडमल हेच मुख्य सूत्रधार आहे. हा कट ‘स्पेशल 26’ या सिनेमाप्रमाणे रचण्यात आला होता.

    IT engineer become Special 26 robbers, robbed jeweller by becoming an income tax officer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!