वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून 73,000 सिग सॉअर असॉल्ट रायफलसाठी ( rifles ) दुसरी ऑर्डर दिली. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने 837 कोटी रुपयांमध्ये हा करार केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये, फास्ट-ट्रॅक खरेदी अंतर्गत, भारताने 647 कोटी रुपयांच्या 72,400 SIG-716 रायफलची ऑर्डर दिली होती.
रायफल्सच्या दुसऱ्या खरेदीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेने (DAC) डिसेंबर 2023 मध्ये मान्यता दिली होती. त्याच्या वितरणानंतर, भारतीय सैन्याकडे 1.45 लाख सिग सॉअर असॉल्ट 716 असॉल्ट रायफल्स असतील.
- J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
रशियन रायफल्सच्या विलंबामुळे भारताने अमेरिकेला ऑर्डर दिली
2018-19 मध्ये रायफलची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी भारताने रशियाकडून AK-203 कलाश्निकोव्ह रायफल मागवल्या होत्या. परंतु ही ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्यामुळे भारताने फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकन फर्म सिग सोहसोबत रायफलचा करार केला होता. 72,400 रायफल्सच्या पहिल्या ऑर्डरपैकी 66,400 रायफल लष्कराला, 4,000 हवाई दलाला आणि 2,000 नौदलाला देण्यात आल्या. चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या पायदळ सैनिकांना या रायफल्स दिल्या जात आहेत. ती हळूहळू INSAS रायफलची जागा घेईल.
जुलै 2024 मध्ये 35 हजार कलाश्निकोव्ह रायफल्सची डिलिव्हरी मिळाली भारत अमेठी येथील इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रशियाच्या मदतीने AK-203 कलाश्निकोव्ह रायफल्सची निर्मिती करत आहे. यामध्ये जुलै 2024 मध्ये 35,000 AK-203 कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल्सची प्रलंबित डिलिव्हरी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली आहे. भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार 10 वर्षात एकूण 6 लाख एके-203 रायफल तयार करायच्या आहेत. AK-203 प्रकल्पाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. मात्र खर्च, रॉयल्टी, तंत्रज्ञान हस्तांतरण आदी समस्यांमुळे प्रकल्पाला विलंब झाला.
India ordered 73 thousand American rifles; 837 crore deal
महत्वाच्या बातम्या
- J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
- Modi cabinet’s decision : मोदी मंत्रिमंडळाचे निर्णय : देशात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे बनणार, 10 राज्यांत 28 हजार कोटींच्या योजना, 40 लाख रोजगार निर्मिती
- Pension Scheme : महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू; अतिरिक्त खर्चास वित्त विभागाची मान्यता!!
- Rohan Jaitley : कोण आहेत रोहन जेटली? BCCIचे सचिव जय शहा यांची जागा घेण्याची शक्यता