• Download App
    सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी; नरसिंह रावांच्या पावलावर पाऊल Although this is a virtual meeting, it's still a first meeting of the sort for us

    सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी; नरसिंह रावांच्या पावलावर पाऊल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदाचा सन्मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे. सुरक्षा समिती सारख्या जागतिक महत्त्वाच्या फोरमवर भारतीय नेत्याने आघाडीवर येऊन नेतृत्व करण्याची ही पहिली संधी आहे. Although this is a virtual meeting, it’s still a first meeting of the sort for us

    यापूर्वी सन 1992 मध्ये तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी झाले होते. भारत आर्थिक सुधारणांच्या वाटेवर अग्रेसर होताना नरसिंह राव यांना सुरक्षा समितीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या समितीत भारताचे ते पहिले दमदार पाऊल होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वर्च्युअल मीटिंगमध्ये भूषविणार आहेत. कोविड काळात या बैठका वर्च्युअल होत आहेत. अन्यथा प्रत्यक्ष सुरक्षा समितीच्या ऐतिहासिक हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली असती. तरीही स्वतंत्र भारताच्या इतिहासातली ही छोटी – मोठी कामगिरी नाही.

    भारताचे नेतृत्व आघाडीवर राहून जागतिक महत्त्वाच्या फोरमवर नेतृत्व करू इच्छित असल्याचा संदेश मोदींच्या नेतृत्वाचे रूपाने देण्यात आला आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील माजी परमनंट प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक महत्त्वाच्या समितीत भारताचे कणखर नेतृत्व प्रस्थापित होण्याचे महत्त्व सय्यद अकबरुद्दीन यांनी अधोरेखित केले आहेत.

    Although this is a virtual meeting, it’s still a first meeting of the sort for us

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!