आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व डाव्या पक्षाच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला चांगलाच फटका बसणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची निर्मिती केली. मात्र ही आघाडी निर्माण झाल्यापासून त्यामध्ये काहीना काही कारणांमुळे बिघाडी होताना दिसत आहे. अगोदर नेतृत्वाचा मुद्दा, त्यानंतर पंतप्रधान पदाची प्रत्येक पक्षाची इच्छा आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधाताच मैदानात उतरणं. यावरून इंडिया आघाडीत एकवाक्यता नाही हे स्पष्ट होत आहे.
Allies of the INDIA alliance only increased the headache of the Congress
आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण, मध्य प्रदेश, राजस्थानमधील जवळपासस १०० पेक्षा अधिक जागांवर काँग्रेसला आपल्या मित्र पक्षांनाच तोंड द्यावे लागणार आहे. त्याशिवाय भाजपाचेही तगडे आव्हान असणार आहे. आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व डाव्या पक्षाच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला चांगलाच फटका बसणार आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याच्या सर्व सूचनाकडे दुर्लक्ष केले आहे.
राजस्थानमध्ये आरएलपीने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसबरोबर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर अनेक ठिकाणी बंडखोर मैदानात उतरले आहेत.
Allies of the INDIA alliance only increased the headache of the Congress
महत्वाच्या बातम्या
- Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश
- नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; दिल्ली-एनसीआर, एमपी-यूपीतही हादरली धरणी
- जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन
- झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र!