• Download App
    उत्तरप्रदेशात रॅलीवर बंदी घाला , विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आवाहन|Allahabad High Court urges Modi to ban rallies in Uttar Pradesh, postpone Assembly polls

    उत्तरप्रदेशात रॅलीवर बंदी घाला , विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आवाहन

    उत्तर प्रदेशात मात्र कोविड नियम तुडवून तुफान गर्दीच्या जाहीर सभा घेतल्या जात आहेत.Allahabad High Court urges Modi to ban rallies in Uttar Pradesh, postpone Assembly polls


    विशेष प्रतिनिधी

    अलाहाबाद : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच अनेक राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत.दरम्यान उत्तर प्रदेशात मात्र कोविड नियम तुडवून तुफान गर्दीच्या जाहीर सभा घेतल्या जात असल्याने अलाहाबाद हायकोर्टाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

    यावेळी उत्तप्रदेशात रॅलीवर बंदी घाला असे अलाहाबाद हायकोर्टाचे नमूद केले आहे. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांचे काय होणार? अस प्रश्न आता सर्वांनाच पडाला आहे.



    अलाहाबाद हायकोर्टाने नेमकं काय म्हटले आहे ?

    उत्तर प्रदेश हायकोर्टात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टातील गर्दी पाहून कोर्टाने मोदींना हे आवाहन केले आहे.

    पुढे हायकोर्टाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा असे मतही हायकोर्टाने नोंदवले आहे.

    Allahabad High Court urges Modi to ban rallies in Uttar Pradesh, postpone Assembly polls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार