प्रतिनिधी
अलिबाग : महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर तडजोड करून महाविकास आघाडीची सत्ता चालवली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभा दावा आहे. या दोन्ही पक्षातील मतभेदांची दरी आणखी रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.All three Shiv Sena MLAs in Raigad district are aggressive against NCP; Demand for removal of Guardian Minister Aditi Tatkare
रायगड जिल्ह्यातल्या महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी थेट पत्रकार परिषद घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदिती तटकरे या मनमानी कारभार करतात. शिवसेनेच्या आमदारांना विचारात घेत नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची कामे केली जात नाहीत,
असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. लवकरच आपण अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवून त्याऐवजी शिवसेनेच्या मंत्र्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद सोपवावे अशी मागणी करणार आहोत, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
अनंत गीते – सुनील तटकरे जुना वाद
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा उभा दावा आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला आहे. त्यानंतर शिवसेनेत राष्ट्रवादी विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. काहीच महिन्यांपूर्वी अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, अशी आठवण अनंत गीते यांनी करून दिली होती. त्यानंतर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या वतीने रायगड जिल्ह्यात अनेक नगरपंचायती काबीज केल्या राष्ट्रवादीला पराभवाचे धक्के दिले त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी देखील शिवसेनेला धडा शिकवण्याचा पवित्रा घेतला आहे
या पार्श्वभूमीवर आज आक्रमक होत शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर राजकीय हल्लाबोल केला आहे.
All three Shiv Sena MLAs in Raigad district are aggressive against NCP; Demand for removal of Guardian Minister Aditi Tatkare
महत्त्वाच्या बातम्या
- कॅडबरी घ्यायला आले आणि काढले पिस्तूल, धाक दाखवून मेडिकल आणि हॉटेलमधील 12 हजार लुटले
- यूपी निवडणूक 2022 : अभिनेत्री कंगनाचे भाजपला जाहीर समर्थन, म्हणाली-त्यांना कोण हरवणार ज्यांचे रक्षक श्रीराम!
- HIJAB CONTROVERSY : कोणी बिकिनी घालून शाळेत जातं का…?मुद्दा फक्त गणवेशाचा ; भारताला इराण बनवायचे आहे का ? प्रियंका वाड्रांच्या वक्तव्यावर रिचा अनिरुद्धचा पलटवार
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करातील जवानाची आत्महत्या