Aditi Tatkare : ‘लाडकी बहीण’मधून 92 लाख महिला का वगळल्या गेल्या? कॅगचे ताशेरे आणि बीडमधील गोंधळावर मंत्री अदिती तटकरेंचा मोठा खुलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, पात्र आणि अपात्र महिलांची नेमकी आकडेवारी समोर ठेवली आहे.