• Download App
    पुण्यातील दुकाने उद्यापासून उघडणार , सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत मुभा ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती|All Shops In Pune Will Be Open From 7 Am To 2 Pm From Tomorrow : Mayer Muralidhar mohol

    पुण्यातील दुकाने उद्यापासून उघडणार , सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत मुभा ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने याच वेळेत सुरु राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. All Shops In Pune Will Be Open From 7 Am To 2 Pm From Tomorrow : Mayer Muralidhar mohol

    पुणे शहरातील निर्बंधांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. तसेच स्थानिक प्रशासनाला रुग्णसंख्येनुसार निर्बंध कमी,



    जास्त करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या नुसार महापौर यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली.याशिवाय, उद्याने, व्यामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सलसेवा सुरू राहणार आहे.

    पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता दोन वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण, त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपी बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी माहिती मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    निर्बंधात काय सवलत…

    • पुण्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू राहणार
    • शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते दोन या कालावधीत फक्त आत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार. बाकी दुकाने बंद राहणार
    • पीएमपी बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार
    • हॉटेल्स बंद राहणार मात्र, पार्सल सुविधा सुरु
    • उद्याने बंद राहणार
    • सरकारी कार्यालयं पन्नास टक्के कर्मचारी संख्येने सुरु.
    • मद्याची दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
    • दुपारी तीननंतर मात्र, संचारबंदी राहील.
    • अत्यावश्यक सुविधा वगळून इतरांना तीननंतर बाहेर पडण्यास मनाई असेल.

    All Shops In Pune Will Be Open From 7 Am To 2 Pm From Tomorrow : Mayer Muralidhar mohol

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elvish Yadav : एल्विश यादवला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा झटका; ड्रग्ज आणि सापाच्या विषाच्या वापराबद्दल गुन्हा दाखल

    Operation sindoor : ब्राह्मोस आणि बंकर स्फोटक बॉम्बचा किराणा हिल्सवर हल्ला, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धक्का, रेडिएशनच्या धोक्यामुळे मोठे स्थलांतर!!

    DGMO Rajiv Ghai : भारताचे DGMO राजीव घई कोण आहेत?:गेल्या वर्षीच जबाबदारी मिळाली, 33 वर्षे सैन्यात सेवा केली