• Download App
    सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस द्या; उद्योजिका किरण मुजुमदार यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती। All Private Employees should Get Booster Dose? Kiran Mazumdar made a demand to the PM Narendra modi

    सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस द्या; उद्योजिका किरण मुजुमदार यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्याची विनंती प्रसिद्ध उद्योजिका आणि बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. All Private Employees should Get Booster Dose? Kiran Mazumdar made a demand to the PM Narendra modi

    देशात रविवारी कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी ७६ कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कंपन्यांचे कर्मचारी देखील कोरोनाबाधित सापडत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामात बाधा निर्माण होत आहे. उद्योगधंदे सुरु ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे, असे किरण मझुमदार म्हणाल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला देखील टॅग केले आहे.



    १० जानेवारीपासून भारतात फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्य़ंत ४० लाख लोकांना ही लस मिळाली आहे. किरण मझुमदार-शॉ या बायोफार्मास्युटिकल्स कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्काराने गौरविले आहे.

    All Private Employees should Get Booster Dose? Kiran Mazumdar made a demand to the PM Narendra modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन