विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात येण्यापूर्वी तुम्ही सगळे निलंबित झाला असाल, असे मंत्री पियुष गोयलांचे कथित “प्रायव्हेट चॅट” तृणमूळ काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी उघड केले. मात्र पियुष गोयल यांनी त्याच्यात संपूर्ण इन्कार केला असून साखर गोखलेंनी पूर्णपणे खोटे आणि गैर हेतूने संबंधित पोस्ट लिहिल्याची टीका केली आहे.All MPs will be suspended before Amit Shah comes; Piyush Goyal’s alleged “private chats” revealed by MP Saket Gokhale; Goyal’s denial!!
संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावर लोकसभा आणि राज्यसभा मिळून 142 खासदारांनी गैरवर्तन करून स्वतःवर निलंबन ओढवून घेतले. त्यानंतर साकेत गोखलेंनी पियुष गोयल यांच्याबरोबर आपले प्रायव्हेट चॅट झाले असा दावा करून ते उघड केले त्यात पियुष गोयल यांनी अमित शहा येण्यापूर्वी तुम्ही सगळे निलंबित व्हाल असे म्हटले असे नमूद केले मात्र पियुष होईल यांनी साकेत गोखलेंचा हा दावा पूर्णपणे खोडून काढला.
साकेत गोखलेंची पोस्ट अशी :
मला खाजगी अनौपचारिक संभाषण उघड करणे चुकीचे वाटते. पण हे काल घडले आहे आणि ते चुकीचे आहे. मी विचारले की, पियुष गोयलजी, आम्ही वेल येऊन विरोध करूनही आपल्यापैकी उरलेल्या खासदारांना राज्यसभेत का निलंबित केले जात नाही? कारण आमच्या भारतातील ४६ सहकाऱ्यांना एका दिवसापूर्वी याच गोष्टीसाठी तत्काळ निलंबित करण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “कारण सदनात विरोधी खासदार 0 उरले तर ते आम्हाला वाईट वाटेल. पण नंतर ते पुढे म्हणाले, “काळजी करू नका, अमित शाह सदनात येण्यापूर्वी तुम्हा सर्वांना आधी निलंबित केले जाईल. @AmitShah जी फौजदारी कायदा विधेयके मांडण्यासाठी राज्यसभेत येतात. मोदींच्या आदेशाने आपल्या संसदेची शक्ती आता अशी घटली आहे.
मात्र पियुष गोयल यांनी साकेत गोखले यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत
All MPs will be suspended before Amit Shah comes; Piyush Goyal’s alleged “private chats” revealed by MP Saket Gokhale; Goyal’s denial!!
महत्वाच्या बातम्या
- वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा इंडिया आघाडीला इशारा; तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका
- तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या चार जातींवर लक्ष केंद्रित करा… भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पीएम मोदींचे प्रतिपादन
- कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला; पंतप्रधान निवासस्थानाबाहेर फुटपाथवर ठेवला पुरस्कार
- पुंछ दहशतवादी हल्ल्यात मोठी कारवाई; चार स्थानिक ताब्यात, चौकशी सुरू