• Download App
    Commander Vyomika Singh अखिलेश यादव यांच्या काकांचा निर्लज्जपणा;

    Commander Vyomika Singh : अखिलेश यादव यांच्या काकांचा निर्लज्जपणा; सैन्यातील अधिकाऱ्यांची काढली जात, विंग कमांडर व्योमिका सिंगबद्दल वादग्रस्त वक्तव्य

    Commander Vyomika Singh

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :Commander Vyomika Singh  देशासाठी झटणाऱ्या वीर अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याऐवजी, समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी थेट सैन्यातील अधिकाऱ्यांची जात काढून खळबळजनक विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांविषयी अशा प्रकारची वादग्रस्त टिप्पणी करून त्यांनी स्वतःचा आणि पक्षाचाही पातळी दाखविल्याचा आरोप होत आहे.Commander Vyomika Singh

    ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पहलगामवरील हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांच्या कार्याचं कौतुक देशभरात होत असताना, रामगोपाल यादव यांनी त्यांच्या जातीवरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला.



    एका सभेत बोलताना ते म्हणाले, “व्योमिका सिंग या हरियाणाच्या जाटव आहेत, त्या * आहेत, पण भाजपाने त्यांच्याबाबत काहीच वाद निर्माण केला नाही, कारण त्यांना राजपूत मानलं गेलं. मात्र कर्नल सोफिया कुरेशी या मुस्लिम असल्यामुळे त्यांच्याबाबत भाजपाच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली.”

    ते यावर थांबले नाहीत. “ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी तिघेही अधिकारी — कर्नल कुरेशी (मुस्लिम), विंग कमांडर व्योमिका सिंग (जाटव) आणि एअर मार्शल अवधेश कुमार (यादव) हे पीडीए म्हणजेच मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समुदायातून आहेत. हे युद्ध पीडीएने लढले, मग भाजपाचे श्रेय घेण्याचे कारण काय?” असा थेट सवाल त्यांनी केला.

    त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देशासाठी लढणाऱ्या वीर अधिकाऱ्यांना जात-पातीत अडकवून राजकीय अजेंडा रेटणं हे अत्यंत लाजिरवाणं असून, अशा वक्तव्यांमुळे सैनिकांच्या बलिदानाचा अपमान होतो, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून उमटत आहे.

    सैन्य ही एक राष्ट्रसेवेची संस्था आहे. ती कोणाच्या जातीवर चालत नाही, हे विसरून रामगोपाल यादव यांनी जे विधान केलं, त्यावरून राजकारणासाठी किती खाली जाऊ शकतो याचा नमुना देशाने पाहिला आहे, अशी टीका होत आहे.

    Akhilesh Yadav’s uncle’s shamelessness; Controversial statement about the caste of army officers, Wing Commander Vyomika Singh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार