• Download App
    Ajit Pawar सत्तेची वळचण टिकवून धरल्यानंतर अजित पवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला; 85 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा!!

    Ajit Pawar सत्तेची वळचण टिकवून धरल्यानंतर अजित पवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला; 85 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा!!

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबीयांमध्ये टोकाचे मतभेद झाल्याचे भासविल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेची वळचण टिकवून धरली. त्यानंतर आज शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या “6 जनपथ” निवासस्थानी गेले. पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा “राजकीय संदेश” अजित पवार आणि शरद पवारांनी या भेटीतून दिला.

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत पवार काका – पुतण्यांची राजकीय लढाई गाजली. या लढाईत दोघांना 50 / 50 यश मिळाले. लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केली, पण विधानसभा निवडणुकीत शरद अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केली. त्यामुळे अजित पवारांना भाजपच्या सत्तेची वळचण टिकवून धरता आली.

    पण त्यादरम्यानच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांच्या कुटुंबीयांबरोबर विशिष्ट अंतर राखूनच व्यवहार केला होता. ते पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडव्याला गोविंद बागेत गेले नव्हते. त्याचबरोबर पवार कुटुंबीयांच्या भाऊबीजेत देखील ते सामील झाले नव्हते. त्यातून पवार कुटुंबीयांमध्ये खरंच मतभेद झाल्याचा आभास अजित पवार आणि शरद पवार यांना निर्माण करता आला होता. त्याचा लाभ सत्तेच्या वळचणीला बसलेल्या अजित पवारांना झाला. अजित पवारांना भाजपने पुन्हा उपमुख्यमंत्री केले.

    विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी शरद पवारांना 85 व्या वाढदिवसानिमित्त आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणून भेट दिली पाहिजे, असा मोठा प्रचार केला होता. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना डबल डिजिट जागा मिळाल्या, पण त्या 85 नव्हे, तर 10 च मिळाल्या.

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार हे सुनेत्रा पवारांना मूळच्या पवार नाहीत असे म्हणाले होते. त्याचबरोबर शरद पवारांनी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांची संभावना कवडीची ही किंमत नसलेला नेता अशी केली होती.

    पण या दरम्यान देखील काही विशिष्ट माध्यमांमध्ये पवार कुटुंबीय आतून एकच आहेत, ते फक्त निवडणुकीच्या काळात फायदा उपटण्यासाठी मतभेद झाल्याचे दाखवत आहेत, असे चर्चिले जात होते. तेच खरे असल्याचे निवडणुकीनंतर शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्ध झाले. पवार कुटुंबीय सत्तेसाठी एकत्रच असतात, ते केवळ मतभेद झाल्याचे भासवतात हे उघड्यावर आले.

    अजित पवारांबरोबरच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे सगळे नेते “6 जनपथ” या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्यांचे स्वागत केले.

    Ajit Pawar arrive at the residence of NCP-SCP chief Sharad Pawar,

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील

    Icon News Hub