प्रतिनिधी
लखनऊ : ड्रायव्हर हरी ओम मिश्रा यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे ‘शेतकरी आंदोलकांनी’ मारहाण केली. यादरम्यान तो आपल्या प्राणांची भीक मागत राहिला. हा ड्रायव्हर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्यासाठी काम करत होता. ड्रायव्हरचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा आहे. रक्तबंबाळ होऊनही तो सोडून देण्यासाठी विनवत होता, पण कुणालाही त्याची दया आली नाही.ajay mishra driver lynched to death lakhimpur kheri farmers violence uttar pradesh
या ड्रायव्हरची मॉब लिंचिंग करण्यात आली. ‘शेतकरी आंदोलकांचा’ एक जमाव त्याच्यावर दबाव आणत होता की, त्याने मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मारण्यासाठी पाठवले होते असे बोलावे. ड्रायव्हर हरीओम मिश्रा वारंवार ‘दादा… दादा, सोडा’ अशी विनवणी करत होता, पण या समाजकंटकांच्या मनाला पाझर फुटला नाही. ते बळजबरी त्याला कबूल करायला लावत होते की, शेतकऱ्यांवर मुद्दामहून गाडी घालायला मंत्र्यांनी सांगितले. तो व्हिडिओत सांगतोय की, मला मंत्र्यांनी पाठवले आहे, परंतु त्यासाठी नाही.
जेव्हा त्याने लाठ्याकाठ्या खाऊनही ‘शेतकरी आंदोलकांना’ हवा तसा जबाब दिला नाही, तेव्हा जमावाने त्याच्यावर हल्ला चढवला. तो जमिनीवर हात जोडून दयेची भीक मागत होता, पण कोणीही त्याचे ऐकले नाही. जमावातील ‘शेतकरी आंदोलक’ त्याला शिवीगाळ करत होते आणि ‘मारो-मारो’ ओरडत होते,
ते व्हिडिओ न बनवण्यासही सांगत होते. खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याला बळजबरी म्हणायला लावण्यात येत आहे की, मंत्र्यांनी त्याला कार अपघात करण्यासाठी पाठवले आहे असे सांगण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न कसा केला जात आहे.
सोशल मीडियावरील अनेकांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, ड्रायव्हरला जबरदस्तीने खोटे बोलून, ‘शेतकरी आंदोलकांनी’ सोशल मीडियावर असा प्रचार केला असता की, मंत्र्याने त्याला मारण्याचा कट रचला होता, पण जेव्हा त्याने खोटे बोलण्यास नकार दिला तेव्हा त्याला ठार मारण्यात आले. लोकांनी राकेश टिकैत यांच्या ट्विट्सवर प्रतिक्रिया दिली की, हे ‘शेतकरी’ मरत नाहीत, तर मारत आहेत. अजय मिश्रा हे खेरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
याशिवाय एका पत्रकाराचीही हत्या झाली आहे. ‘एबीपी न्यूज’चे संपादक पंकज झा यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली, “लखीमपूरमध्ये बातमी देणारे आमचे एक साथीदार रमण यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.” रमण कश्यप हे निघासन मतदारसंघातील रहिवासी होते आणि घटनेच्या कव्हरेजसाठी गेले होते. या घटनेचा निषेध करत लोकांनी उपद्रवी समाजकंटकांचा निषेध नोंदवला आहे.
ajay mishra driver lynched to death lakhimpur kheri farmers violence uttar pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले – ‘ऑक्सिजन निर्मिती स्वयंपूर्णतेच्या दिशेने’
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय; निवडणूक लढवण्याची तयारी
- Story Behind SAMANA Editorial: मराठवाड्यात ‘देवेंद्र’ थेट बांधावर-घाव मात्र घरात बसलेल्या ठाकरे-पवार सरकारच्या वर्मावर ! पुन्हा केंद्राकडे बोट दाखवत-पसरले हात …
- जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान स्पेनच्या आजोबांना; वयोमान ११२ वर्षे २११ दिवस