विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे एकमेव हिंदू आमदार फणीधर तालुकदार यांनी मंगळवारी आसामच्या लोकांच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या कामगिरीमुळे आपण प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.AIUDF’s only Hindu MLA in the BJP, the decision was affected by the work of the Chief Minister
आसाममध्ये बद्रुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील एआययूडीएफचे १६ आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी १५ जण मुस्लिम समाजाचे आहेत. तालुकदार हे एकमेव हिंदू आमदार आहेत. एक सप्टेंबर रोजी ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
तालुकदार यांनी सांगितले की, मला एआययूडीएफमध्ये कोणतीही अडचण नव्हती. पण भाजपने आणि विशेषत: मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी केलेल्या केलेल्या कामांमुळे मी विशेष प्रभावित झालो आहे. माझ्या मतदारसंघाच्या भल्यासाठी राजीनामा देत आहे.
मार्च महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी तालुकदार एआययूडीएफमध्ये सामील झाले होते. त्याआधी त्यांनी २०११ आणि २०१६ मध्ये बाजाली जिल्ह्यातील भबानीपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. २०२१ च्या निवडणुकीत त्यांनी एनडीए सहयोगी आसाम गण परिषदेचे उमेदवार रणजीत डेका यांच्या विरोधात सुमारे तीन हजार मतांनी विजय मिळविला होता.
तालुकदार यांच्या राजीनाम्यामुळे आसाममधील पाच मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. एआययूडीएफचे भाजपशी छुपे संबंध असल्याचा आरोप करत कॉँग्रेसने नुकतीच या पक्षाशी असलेली युती तोडली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी तालुकदार यांनी राजीनामा दिला आहे.
AIUDF’s only Hindu MLA in the BJP, the decision was affected by the work of the Chief Minister