• Download App
    अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव,३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह Ahmednagar: Corona infiltration in Zilla Parishad headquarters, reports of 33 employees are positive

    अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव,३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

     

    अहमदनगर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उयायोजना राबविण्यास सुरवात केलेली आहे.Ahmednagar: Corona infiltration in Zilla Parishad headquarters, reports of 33 employees are positive


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाने एन्ट्री केली आहे.दरम्यान त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरले आहेत.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यान अहमदनगर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उयायोजना राबविण्यास सुरवात केलेली आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसह बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

    आज एकूण ३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.त्यामुळे प्रशासनाने कडक उपयायोजना करण्यास सुरवात केलेली आहे. त्यातील काहींनी तपासणी केलेली आहे. तर काहींनी अद्याप तपासणी केलेली नसल्याने त्यांची तपासणी प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.

    तसेच जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोना शिरकाव केला होता.यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.

    Ahmednagar: Corona infiltration in Zilla Parishad headquarters, reports of 33 employees are positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!