• Download App
    विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे बंधन पालकांवर नाही , आदित्य ठाकरेंनी दिला सल्ला|Parents are not obliged to send students to school, advises Aditya Thackeray

    विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे बंधन पालकांवर नाही , आदित्य ठाकरेंनी दिला सल्ला

    राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून सोमवारपासून (आज ता. २४) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत.Parents are not obliged to send students to school, advises Aditya Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान जर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांना जोखमीचे वाटत असेल तर त्यांनी मुलांना पाठवू नये, असाही सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.राज्यातील कोरोना स्थिती पाहूनच महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. संबंधितांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.

    राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून सोमवारपासून (आज ता. २४) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत.या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.



    यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ” कोरोना काळात बऱ्याच दिवसांपासून शाळा बंद होत्या.दरम्यान त्या शाळा आता पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंधनकारक नाही.”

    तसेच पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की , ” वर्ग भरल्यानंतर कोरोना पसरणार नाही याची काळजी प्रथम शाळा आणि पालकांनी घ्यावी.तसेच कोरोनाचा संसर्ग जिथे वाढणार नाही, अशाच भागांतील शाळा सुरू होतील.

    तर काही जिल्ह्यांत लगेचच शाळा उघडणार नाहीत.” दरम्यान काही पालक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी सरसकट शाळा उघडण्यास याआधीच विरोध दर्शविला होता. यामुळे राज्य सरकारने देखील सावध भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

    Parents are not obliged to send students to school, advises Aditya Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!