• Download App
    भगौडे संदेसरा बंधूकडून अहमद पटेल यांच्या जावयाला मिळाले पैसे , कोट्यवधी रुपयांची मालमत्ता केली जप्त|Ahmed Patel's son-in-law gets money from fugitive Sandesara brothers, property worth crores of rupees confiscated

    भगौडे संदेसरा बंधूकडून अहमद पटेल यांच्या जावयाला मिळाले पैसे , कोट्यवधी रुपयांची मालमत्ता केली जप्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: गुजरातमधील व्यावसायिक संदेसरा बंधुंनी १४,५०० कोटींचं बँकेचं कर्ज थकवून फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयाची कोट्यवधींची मालमतात जप्त करण्यात आली आहे. मनी लॉड्रींग संबंधी चौकशी केल्यानंतर संदेसरा बंधुंनी आणि इरफान सिद्दीकीदरम्यान आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे समोर आलं आहे.Ahmed Patel’s son-in-law gets money from fugitive Sandesara brothers, property worth crores of rupees confiscated

    यात अभिनेता डिनो मोरियाही सामील आहे. ज्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे, तेवढ्याच रकमेची मालमत्ता जप्त केली गेली आहे, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितले.या प्रकरणात कथितरित्या बँकेची १४, ५०० कोटींच्या कजार्ची फसवणूक केल्याचा आरोप आहे.



    या प्रकरणी स्टर्लिंग बायोटेक आणि याचे मुख्य प्रवर्तक आणि संचालकांपैकी नितीन जयंतीलाल संदेसरा, चेतनकुमार जयंतीलाल संदेसरा आणि दीप्ती संदेसरा हे गायब आहेत. नितीन आणि चेतनकुमार हे संदेसरा बंधु २०१७ मध्ये इतरांसोबत भारतातून पळून गेले होते.

    संदेसरा बंधू हे एकेकाळी चहाच्या मळ्यांच्या व्यवसायात होते. त्यानंतर फार्मा उद्योगात वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. १९९० मध्ये त्यांनी स्टर्लिंग बायोटेकचा पहिला कारखाना वडोदरा येथे सुरू केला. पुढच्या दहा वर्षांत भारतीय बाजारातील जिलेटिन उद्योगातील ९० टक्के हिस्सा त्यांच्या हाता गेला.

    यासाठी अहमद पटेल यांची त्यांना मदत झाली होती असे म्हणतात. आंध्रा बॅँकेच्या वतीने त्यांना २००६ मध्ये कर्जे मंजूर झाली होती. त्यावेळी कॉँग्रेसचे सरकार आणि अहमद पटेल हे कॉँग्रेसमधील वजनदार नेते होते.

    बॅँकांची देणी चुकविली नसल्याने ऑक्टोबर २०१७ मध्ये सीबीआयने संदेसरा बंधूंवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अहमद पटेल यांचा मुलगा फैैसल पटेल याचीही चौकशी झाली होती. या घोटाळ्यात आता चार जणांची मालमत्ता जप्त करण्याचे प्राथमिक आदेश जारी करण्यात आले आहेत.

    मालमत्ताचे किंमत ही ८.७९ कोटी रुपये आहे. हा घोटाळा जवळपास १६ हजार कोटी रुपयांहून अधिकचा आहे. त्यापैकी १४ हजार ५१३ कोटी रुपयांची मालमत्ता ईडी ने आतापर्यंत मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त केली आहे.

    जप्त करण्याय येत असलेल्या मालमत्तेत खानची मालमत्ता ही तीन कोटी, डिनो मोरियाची १.४ कोटी आणि डिजे अकीलची १.९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी यांच्या २.४१ कोटींच्या मालमत्तेचा यात समावेश आहे. संदेसरा बंधुनी गैरव्यवहारातील काही संपत्ती ही या चार जणांना दिली, असं ईडीने म्हटलं आहे. संदेसरा बंधुंना विशेष कोटार्ने फरार घोषित केलं आहे.

    Ahmed Patel’s son-in-law gets money from fugitive Sandesara brothers, property worth crores of rupees confiscated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक