• Download App
    केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!|Agriculture Minister from Maharashtra at the Centre, the packages of Vidarbha farmers were looted in the middle; Modi's attack from Yavatmal!!

    केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ :  केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातलेच नेते कृषिमंत्री असताना केंद्रातून विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर व्हायचे, पण ते मधल्या मध्येच लुटले जायचे. शेतकऱ्यांच्या हातात काही मिळायचेच नाही, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यवतमाळ मधून शरद पवारांवर हल्लाबोल केला.Agriculture Minister from Maharashtra at the Centre, the packages of Vidarbha farmers were looted in the middle; Modi’s attack from Yavatmal!!

    *केंद्रात कृषिमंत्री असताना शरद पवारांनीच यवतमाळ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा मोठा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना 72000 कोटींची कर्जमाफी केल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात ते पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडता ते थेट सहकारी बँकांमधल्या कर्ज खात्यात जमा करून पवारांनी बँकांच्या तिजोऱ्या भरल्या होत्या, याची अप्रत्यक्ष आठवण पंतप्रधान मोदींनी आजच्या टीकेतून करून दिली.*



    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले, “तुम्ही आठवा, केंद्रात जेव्हा इंडी आघाडीची सत्ता होती तेव्हा काय परिस्थिती होती?? तेव्हा तर कृषिमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज जाहीर व्हायचे, पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी मधल्या मध्येच लुटले जायचे. गाव, गरीब शेतकरी, आदिवासींना त्या पॅकेज मधून काहीच मिळायचे नाही!!

    *आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहता – पाहता पीएम किसान सन्मान योजनेचे 21000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले. हा आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून 1 रुपया निघायचा आणि सर्वसामान्यांपर्यंत 15 पैसे पोहोचायचे. आज काँग्रेसचे सरकार असते, तर जे आज शेतकऱ्यांना जे 21000 कोटी रुपये मिळाले आहेत, त्यापैकी 18000 कोटी रुपये मधल्या मध्येच लुटले गेले असते. पण आता भाजप सरकारमध्ये गरिबांचा पूर्ण पैसे गरिबांनाच थेट मिळत आहे!!

    ’11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे’

    “मोदीची गॅरंटी आहे, प्रत्येक लाभार्थीला त्याचा अधिकार मिळाला आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा व्हायला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारची डबल गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3800 कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे 12 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मिळत आहे. देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. यातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 30 हजार कोटी आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना 900 कोटी रुपये मिळाले आहेत. तुम्ही कल्पना करा की, हे पैसे छोट्या शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

    10 वर्षांपूर्वी हाहा:कार होता’

    “गेल्या 10 वर्षात आमचा निरंतर प्रयत्न राहिलाय की, गावात राहणारे आणि परिवारच्या नागरिकांना सर्व सुविधा द्वावे. पाणी प्रश्न सोडवावा. दहा वर्षांपूर्वी हाहा:कार होता. देशातील गावांमध्ये 100 पैकी 15 कुटुंब असे होते जिथे पाईपने पाणी जायचं. गरीब, आदिवासी आणि दलितांना ही सुविधा मिळत नव्हती. त्यामुळे लाल किल्ल्यावरुन मोदीने हर घर जलची गॅरंटी दिली होती. आज 100 पैकी 75 ग्रामीण कुटुंबांच्या घरी पाईपने पाणी पोहोचलं आहे. महाराष्ट्रात 50 लाख पेक्षा कमी परिवारांपर्यंत नळाचं कनेक्शन होतं. आज सव्वा करोड नागरिकांपर्यंत नळ कनेक्शन आहे, असे मोदींनी सांगितले.

    काँग्रेसने आदिवासी समाजाला नेहमी सर्वात मागे ठेवले. त्यांना सुविधा दिल्या नाहीत. पण मोदीने सर्वात मागास समाजांचा विचार केला. पहिल्यांचा त्यांच्या विकासासाठी 23000 हजार कोटींची पीएम जनधत योजना सुरु झालीय. या योजनेतून महाराष्ट्राच्या कातरी, कोलाम आणि महाडिया सारख्या अनेर जनजातीय समुदायांना चांगलं जीवन देणार. गरीब, शेतकरी, जवान आणि नारीशक्तीला सशक्त करण्याचा हे अभियान आणखी वेगाने होईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

    Agriculture Minister from Maharashtra at the Centre, the packages of Vidarbha farmers were looted in the middle; Modi’s attack from Yavatmal!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त