• Download App
    मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 : लोकसभेत विधेयक सादर; अल्पसंख्यांक समाज प्रतिकूल म्हणून तृणमूळ काँग्रेसचाही विरोध!!। Age of marriage of girls from 18 to 21: Bill introduced in Lok Sabha; Opposition to Trinamool Congress as anti-minority society !!

    मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ : लोकसभेत विधेयक सादर; अल्पसंख्यांक समाज प्रतिकूल म्हणून तृणमूळ काँग्रेसचाही विरोध!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत मांडले. त्यावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून काँग्रेस पक्षाने या विधेयकाला ठाम विरोध केला आहे. संबंधित विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. Age of marriage of girls from 18 to 21: Bill introduced in Lok Sabha; Opposition to Trinamool Congress as anti-minority society !!

    तर देशातल्या अल्पसंख्यांक समाजाचा मूळातच मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याला पूर्ण विरोध आहे. त्यामुळे तृणमूळ काँग्रेस देखील या विधेयकाला विरोध करते आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे गटनेते खासदार सुगत रॉय यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.



    मोदी सरकारने काल निवडणूक सुधारणा विधेयक मांडून मतदार नोंदणी आणि मतदार यादीला आधार कार्ड जोडणी संदर्भातली तरतूद केली आहे. या विधेयकाला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेससह बाकीच्या सर्व विरोधकांनी त्या विधेयकाला विरोध केला होता.

    पण आता मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याच्या विधेयकाला तृणमूल काँग्रेसने अल्पसंख्यांकांचा विरोध असल्याचे कारण देत पक्षीय पातळीवर देखील विरोध केला आहे आणि काँग्रेससह सर्व विरोधकांच्या आवाजामध्ये आपला आवाज मिसळला आहे.

    Age of marriage of girls from 18 to 21: Bill introduced in Lok Sabha; Opposition to Trinamool Congress as anti-minority society !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार