• Download App
    26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल । After the 26/11 attacks, the resistance of the UPA government showed weakness; Congress MP Manish Tiwari's attack

    26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : धर्म हा काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नाही असे काहीच दिवसांपूर्वी मंदिरांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावणाऱ्या खासदार मनीष तिवारी यांनी आता यूपीए सरकारची कमजोरी बाहेर काढली आहे.  After the 26/11 attacks, the resistance of the UPA government showed weakness; Congress MP Manish Tiwari’s attack

    26 /11 मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारचा प्रतिकार कमजोर होता, असे टीकास्त्र त्यांनी आपल्या नव्या पुस्तकात सोडले आहे. 26 /11 सारखा संपूर्ण देशावर झालेला दहशतवादी हल्ला असताना यूपीए सरकारने कठोरपणे पावले टाकायला हवी होती. भारत कमजोर नसल्याचा संदेश सगळ्या जगाला द्यायला हवा होता. परंतु सरकार त्यात कमी पडले त्यामुळे जगासमोर भारताची प्रतिमा कमजोर देश अशी झाली, असे परखड टीकास्त्र मनीष तिवारी यांनी आपले नवे पुस्तक “टेन प्लांट फ्लॅश पॉईंट्स ट्वेंटी इयर्स” यातून सोडले आहे.



    26/ 11 मुंबई हल्ल्याच्या वेळी केंद्रात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी हा हिंदू अतिरेक्यांनी केलेला हल्ला असल्याचे भासविले होते. पी. चिदंबरम दिग्विजयसिंह यांच्यासारख्या नेत्यांनी “हिंदू दहशतवाद” ही संकल्पना देखील देशावर लादण्याचा प्रयत्न केला होता.

    या पार्श्वभूमीवर 26/ 11 च्या हल्ल्याबाबत काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी यूपीए सरकारची कमजोरी दाखविणे याला राजकीय दृष्ट्या देखील महत्त्व आहे. मनीष तिवारी यांनी नुकतीच काँग्रेसच्या नेत्यांवर आपल्या राजकारणाचा आधार धर्म नसल्याचे सांगून टीका केली होती आता त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने काँग्रेसच्या संरक्षणात धोरणावर देखील प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे.

    After the 26/11 attacks, the resistance of the UPA government showed weakness; Congress MP Manish Tiwari’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी