• Download App
    Nur Khan Airbase भारताने नूर खान हवाई तळावर हल्ला केला, असीम मुनीरच्या हवाल्याने शहाबाज शरीफचा कबूलनामा!!

    भारताने नूर खान हवाई तळावर हल्ला केला, असीम मुनीरच्या हवाल्याने शहाबाज शरीफचा कबूलनामा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तान मध्ये अतिशय अचूक हल्ले करून तिथले हवाई तळ आणि दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तान विजय झाल्याचा दावा केला. लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याच्याबरोबर ते वेगवेगळ्या लष्करी तळांवर फिरले. ते गवताने शाकारलेल्या रणगाड्यावर उभे राहिले. युद्धामध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्याचा दावा केला, पण अखेरीस मोठे सत्य त्यांच्या तोंडून बाहेर आल्याशिवाय राहिले नाही.

    भारताने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला याची कबुलीच शहाबाज शरीफ यांनी दिली.

    शहाबाज शरीफ म्हणाले :

    10 मे रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या दरम्यान मला जनरल असीम मुनीर याने फोन करून उठवले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नूर खान आणि अन्य हवाई तळांवर मिसाईल हल्ले केल्याचे असीम मुनीर याने मला सांगितले. त्याचवेळी त्याने पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमने भारतीय हवाई हल्ला परतवून लावल्याचे देखील सांगितले पण पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीम भेदून भारतीय हवाई दलाने काही ठिकाणी नुकसान केल्याचेही त्याने सांगितले.

    प्रत्यक्ष पाकिस्तानी पंतप्रधानाच्या तोंडून पहिल्यांदाच हा कबूलनामा आल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. कारण भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातल्या सर्व हवाई तळांवर अचूक हल्ला करून पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीम भेदल्याचे प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितलेच होते. पण पाकिस्तानने मात्र त्याचा वारंवार इन्कार केला होता. पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य असल्याचा दावा केला होता. उलट पाकिस्ताननेच भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचा दावा केला होता.

    पण अखेर हे सगळे दावे फोल ठरवून पाकिस्तानी पंतप्रधानानेच आपल्या तोंडून पाकिस्तानातल्या सर्वांत महत्त्वाच्या नूर खान हवाई तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्याची कबुली दिली.

    After series of denials, Pakistan PM Sharif admits India’s missiles hit Nur Khan Airbase

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम