विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाब कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योसिंग सिध्दू यांचाच कॉँग्रेसला होणार ताप थांबेना झाल आहे. माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना पक्षातून घालविल्यावर आता सिध्दूंनी आपला निशाणा मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे वळविला आहे. पंजाबमधील आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.After ousting Amarinder Singh, now Charanjit Singh Channi will next target , Sidhu will go on a hunger strike against his own government
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत असलेल्या मतभेदांवर सिद्धूंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर अमरिंदर सिंग यांना पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा द्यावा लागला. पंजाबचे मुख्यमंत्री झालेले चरणजीतसिंग चन्नी यांच्यासोबत देखील नवज्योतसिंग सिद्धू यांचे मतभेद होऊ लागले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात दंड थोपटले असून थेट उपोषणालाच बसण्याचा इशारा दिला आहे.
- नवज्योत सिंग सिध्दूंच्या नेतृत्वाखालची काँग्रेस म्हणजे क़ॉमेडी शो; हरससिमरत कौर बादल यांचे टीकास्त्र
एका जाहीर सभेत पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करताना सिध्दू म्हणाले, ड्रग्जसंदभार्तील अहवाल जाहीर करावा. जर सरकारने हा अहवाल जाहीर केला नाही, तर आपण उपोषणाला बसू्यकॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री असताना नवज्योत सिंग यांचे त्यांच्याशी टोकाचे मतभेद झाले होते.
केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर हे मतभेद निवळल्याचं देखील दिसून आलं. मात्र, काही दिवसांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे संबंध निवळलेच नसल्याचष स्पष्ट झाले. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं नवज्योतसिंग सिद्धू पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले.
मात्र, चरणजीतसिंग चन्नी यांच्याशीही सिद्धूंचे मतभेद सुरूच राहिले. त्यामुळे नाराज होत सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र, नंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी करत त्यांना राजीनामा मागे घ्यायला लावला.पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांसाठी काँग्रेस, आप, भाजपा, शिरोमणी अकाली दल या सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचीही भर पडली आहे. त्यामुळे येत्या काळात पंजाबमधील राजकीय घडामोडी अधिकच वाढणार, याचीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिलेला उपोषणाचा इशारा ही सुरुवात ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
After ousting Amarinder Singh, now Charanjit Singh Channi will next target , Sidhu will go on a hunger strike against his own government
महत्त्वाच्या बातम्या
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!
- भाजप – काँग्रेस यांचे ठरल्यानुसार विधान परिषद निवडणूक बिनविरोध