प्रतिनिधी
मुंबई : लव्ह जिहादच्या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतरही तो एका मुलीबरोबर त्याच फ्लॅटवर डेटिंग करत होता. असे असतानाही काही मराठी माध्यमांनी वेगळे नॅरेटिव्ह चालवून आफताब विषयी छुपी सहनभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर तयार होईल अशा बातम्या दिल्या आहेत. Aftab was single, open your eyes and see well
या पैकी एक बातमी त्याच्या आई-वडिलांचा हवाला देऊन केली आहे. आफताब हा एकलकोंडा होता. त्याने उच्च शिक्षण घ्यावे, असे म्हणे त्याच्या वडिलांना वाटत होते. त्याने श्रद्धा बरोबर राहू नये, असे आई-वडिलांचे मत होते. पण, त्याने त्यांचे ऐकले नाही आणि तो श्रद्धा बरोबर निघून गेला. आफताबला आपल्या जीवनात पुढे काय करायचे होते ही कधी समजलेच नाही, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
इतकेच काय पण आफताब एवढा निर्दयी होऊन खून करेल असे आम्हाला वाटतही नसल्याचे आई-वडिलांचे म्हणणे होते. आफताबला श्रद्धाच्या निर्घृण खुनात अटक झाल्यानंतर आता त्याचे आई-वडील दिल्लीला गेले आहेत… पण त्यांनी आफताब एकलकोंडा होता असे सांगितले आहे, त्यांना एक्सपोज करणारे काही फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. आफताब हा एकाच वेळी अनेक मुलींबरोबर अफेयर्स होती, हेच त्यातून दिसून येत आहे.
साध्वी प्राची यांनी हे फोटो आपल्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केले आहेत. हे पाहिल्यावर तो “किती एकलकोंडा” होता की अन्य काही होता, हे स्पष्ट दिसते. हे सर्व फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या तारखा आणि वर्षे स्पष्ट दिसत आहेत. तो फुड ब्लॉगर होता. त्याचे 28000 फॉलोवर्स होते आणि म्हणे तो एकलकोंडा होता…
Aftab was single, open your eyes and see well
महत्वाच्या बातम्या
- आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा
- सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
- देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांचे स्पष्ट प्रतिपादन
- सक्तीच्या धर्मांतरातून राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका; सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रोखण्यासाठी काय उपाय करताय?, केंद्राला विचारणा