अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या जादुई फिरकीमुळे अफगाणिस्तानने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. Afghanistan beat defending champions England by 69 runs Strong innings by Rashid Mujeeb
अफगाणिस्तानने प्रथम खेळून रहमानउल्ला गुरबाजच्या 80 धावांच्या तुफानी खेळीमुळे 285 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 40.3 षटकांत केवळ 215 धावांत गडगडला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 61 चेंडूत 66 धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. तर अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद नबीला दोन बळीला यश मिळाले.
अफगाणिस्तानने दिलेल्या 286 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो दुसऱ्याच षटकात केवळ एक धाव घेत बाद झाला. बेअरस्टोला फजलहक फारुकीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जो रूटही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. रुट १७ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा करून बाद झाला. त्याला मुजीब उर रहमानने बोल्ड केले.
यानंतर साऱ्यांच्या नजरा डेव्हिड मलानवर खिळल्या होत्या, मात्र मालन अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचा फार काळ सामना करू शकला नाही. तो 39 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.
Afghanistan beat defending champions England by 69 runs Strong innings by Rashid Mujeeb
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!