• Download App
    ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहचून चौथ्या स्थानावर राहणे... जीव तुटतो... पण आत्मविश्वास गमावणार नाही; गोल्फर आदिती अशोकचे भावपूर्ण उद्गार Aditi Ashok has done excellent job.She missed medal but has shown her international standard & there's a great future for her. Karnataka

    ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहचून चौथ्या स्थानावर राहणे… जीव तुटतो… पण आत्मविश्वास गमावणार नाही; गोल्फर आदिती अशोकचे भावपूर्ण उद्गार

    वृत्तसंस्था

    टोकियो : प्रचंड मेहनत करून ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचे. जिद्दीने प्रतिस्पर्ध्यांची टक्कर द्यायची पण नेमकी पहिल्या तिघांना पदके मिळतात आणि चौथ्याला मात्र फटका बसतो. यामुळे जीव तुटतो, असे भावपूर्ण उद्गार भारतीय गोल्फर आदिती अशोक तिने हिने काढले आहेत. अर्थात यामुळे आत्मविश्वास गमावणार नसून भविष्यात मी नक्कीच चांगली कामगिरी करेन, असे उद्गारही तिने काढले Aditi Ashok has done excellent job.She missed medal but has shown her international standard & there’s a great future for her. Karnataka

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्फमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचून आदित्य अशोक हिने इतिहास रचला. भारतीय गोल्फसाठी तिची कामगिरी सर्वोत्तम आहे. तरी देखील थोडक्यात पदक हुकल्यामुळे तिची निराशा झाली. ती तिने बोलून दाखविली. अर्थात एका सामन्यामुळे निराश व्हायचे कारण नाही मी माझी कामगिरी अधिक उंच होऊ शकेल, असा आत्मविश्वास देखील तिने व्यक्त केला.

    आदिती अशोकच्या खेळात कोणतीही चूक नव्हती तिच्या फटक्यांचा वेग आणि दिशा अचूक होत्या. तिने पंधरा होलपर्यंत अचूक खेळी केली. भारतीय गोल्फरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या पिढ्यांसाठी ती नक्की प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया भारताचे टॉप गोल्पर जीव मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली. आदितीच्या खेळातल्या सर्व तांत्रिक बाजू उत्तम होत्या. ही उत्तमता कमावणे सोपे नाही. ते तिने मेहनतीने साध्य केले आहे, असे जीव मिल्खा सिंग यांनी सांगितले.

    आदिती अशोक हिचे भवितव्य उत्तम आहे. गोल्फ खेळातून ती भारतासाठी भविष्यात सर्वोत्तम योगदान करेल, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.

    आदिती अशोक हिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पदक मिळाले नाही तरी करोडो भारतीयांची मने जिंकली आहेत, अशा भावना सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. भारताचा क्रीडा क्षेत्रातला आत्मविश्वास टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने वाढला आहे. याचे परिणाम भविष्यात नक्की दिसतील, असा आत्मविश्वास देखील विविध क्रीडापटूंनी आणि कोच यांनी व्यक्त केला आहे.

    Aditi Ashok has done excellent job.She missed medal but has shown her international standard & there’s a great future for her. Karnataka

    Related posts

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव