• Download App
    सर्वांसाठी लस खुली करा म्हणणाऱ्याना आदर पूनावालांचेच उत्तर, भारताची तेवढी उत्पादन क्षमताच नाही|Adar Poonawalas answer to those who say open the vaccine for all, India does not have that much production capacity

    सर्वांसाठी लस खुली करा म्हणणाऱ्यांना आदर पूनावालांचेच उत्तर.. भारताची काय, पण जगाची ही नाही तेवढी उत्पादन क्षमता! प्राधान्यक्रम आवश्यक

    देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी खुली करावी अशी मागणी होत आहे. यासाठी केंद्र सरकारवर टीकाही केली जात आहे. पण हे म्हणणाऱ्याना सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनीच उत्तर दिले आहे. भारताची तेवढी क्षमताच नाही असे त्यांनी म्हटले आहे.Adar Poonawalas answer to those who say open the vaccine for all, India does not have that much production capacity


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी खुली करावी अशी मागणी होत आहे. यासाठी केंद्र सरकारवर टीकाही केली जात आहे. पण हे म्हणणाऱ्याना सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनीच उत्तर दिले आहे. भारताची तेवढी क्षमताच नाही असे त्यांनी म्हटले आहे.

    सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. मात्र, भारताच्या मोठ्या लोकसंख्येला लस पुरविण्याची क्षमता सिरमचीच नव्हे तर जगातील कोणत्याही कंपनीची नाही, असे पूनावाला यांनी म्हटले आहे. सध्या कंपनी सहा ते सात कोटी डोसचे उत्पादन करू शकते. मात्र, त्यासाठी सरकारी मदत आणि बॅँकेचे कर्ज काढावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



     

    सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्डने विकसित केलेली कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करते. याबाबत पूनावाला म्हणाले, आम्ही फेब्रुवारीपर्यंत १० कोटी लस उत्पादनाची क्षमता तयार करणार होतो. मात्र, मांजरी येथील सिरमच्या इमारतीला लागलेल्या आगीमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे.

    सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत आश्चर्य व्यक्त करताना पूनावाला म्हणाले, आम्ही कल्पनाही केली नव्हती की भारतासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीचे डोस लागतील. सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या अकल्पित असल्याचही त्यांनी सांगितले.

    अमेरिकेच्या कोव्होव्हॅक्स या लसीचेही उत्पादन सिरममध्ये करण्याची योजना आहे. चार ते पाच कोटी डोसची क्षमता आगामी तीन महिन्यांत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, हे सगळे अमेरिकेच्या कायद्यांवर अवलंबून आहे. अमेरिकेने सध्या कच्चा मालाच्या निर्यातीवर बंधने घातली आहेत. त्यामुळे कोव्होव्हॅक्सच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचेही पूनावाला यांनी सांगितले.

    लहान मुलांच्या लसीकरणावर अदर पूनावाला म्हणाले, आम्ही ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राजेनेकाने घेतलेल्या चाचण्यांच्या आधारावर लहान मुलांसाठीच्या लसीसाठी आम्हीही परवाना मागणार आहोत. मात्र, त्याला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

    Adar Poonawalas answer to those who say open the vaccine for all, India does not have that much production capacity

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य