महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंदिर, आश्रम, हॉटेल, गेस्ट हाऊस आदी ठिकाणी त्याचा शोध घेत होते
विशेष प्रतिनिधी
मथुरा : महाराष्ट्र ( Maharashtra ) पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एका फरार आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीवर 300 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. मथुरा जिल्ह्यातील कृष्णा बलराम मंदिराजवळ वृंदावन पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. साधूच्या वेशात आरोपीला मथुरेत अटक करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बबन विश्वनाथ शिंद असे असून तो बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. बबन शिंदे याला अटक करण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलिसांचे पथक मथुरा येथे आले होते, असे पोलिसांनी सांगितले. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो एका प्रसिद्ध मंदिराजवळ साधूच्या वेशात फिरताना आढळून आला.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडले
पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान आरोपी शिंदे हा मथुरा येथे एका वर्षापासून साधूच्या वेशात राहत असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंदिर, आश्रम, हॉटेल, गेस्ट हाऊस आदी ठिकाणी त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा वेशात राहत होता. महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने मथुरा पोलिसांची गुन्हे शाखा आणि वृंदावन पोलिसांची मदत घेतली असता आरोपी सापडला.
काय आहे आरोप?
शिंदेवर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ‘जिजाऊ माँ साहेब मल्टी स्टेट बँके’मधील ठेवीदारांचे 300 कोटी रुपयांचा गंडा घालून तेथून फरार झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो वृंदावनात आला आणि साधूच्या वेशात राहिला. शिंदे याच्यावर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात अनेक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि नंतर त्याला महाराष्ट्रात परत नेले.
Accused in the Rs 300 crore scam in Maharashtra arrested in Mathura
महत्वाच्या बातम्या
- Aadhaar PAN : केंद्र सरकारने आधार, पॅन कार्डची माहिती लीक करणाऱ्या वेबसाइट केल्या ब्लॉक!
- 3 Param Rudra : PM मोदींनी केले 3 ‘परम रुद्र सुपर कॉम्प्युटर’चे उद्घाटन
- Sambhji Raje : मनोजराव, आता कुणाला भेटू नका, विश्रांती घ्या; आठवडाभरात दुसऱ्यांदा भेटून संभाजीराजेंचा सल्ला!!
- Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या प्रश्नांना विकासकामातून उत्तर