• Download App
    पश्चिम बंगालमधील वर्धमान रेल्वे स्थानकावर अपघात; पाण्याची टाकी कोसळून 2 ठार, 15 जण जखमी|Accident at Vardhaman railway station in West Bengal; 2 killed, 15 injured in water tank collapse

    पश्चिम बंगालमधील वर्धमान रेल्वे स्थानकावर अपघात; पाण्याची टाकी कोसळून 2 ठार, 15 जण जखमी

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील वर्धमान रेल्वे स्थानकावर मोठा अपघात झाला आहे. बुधवारी (13 डिसेंबर) दुपारी 12 वाजता फलाट क्रमांक 2 आणि 3 वर पाण्याची टाकी पडल्याने 2 जणांचा मृत्यू झाला तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.Accident at Vardhaman railway station in West Bengal; 2 killed, 15 injured in water tank collapse



    या घटनेनंतर अग्निशमन दलासह रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बचावकार्य केले. टाकीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. 3 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. टाकी पडल्यानंतर रेल्वे रुळावर पडलेले दगड तेथे उपस्थित लोकांच्या अंगावर उसळले. यामुळे अनेक जण जखमीही झाले आहेत.

    3 अधिकारी निलंबित

    या घटनेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वरून सेवा बंद करण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 4 वरील रेल्वे सेवा सुरू आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाण्याच्या टाकीची क्षमता 53 हजार गॅलन आहे. ही टाकी बरीच जुनी असल्याने ती तुटल्याचे सांगण्यात आले आहे.

    Accident at Vardhaman railway station in West Bengal; 2 killed, 15 injured in water tank collapse

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार