• Download App
    शेतकऱ्यांसाठी आपचे प्रेम पुतना मावशीचेच, सत्तेवर आल्यावर 15 दिवसांतच लाठीमार|AAPs love for farmers is like that of Putna's aunt, only 15 days after came in power farmers beaten by police

    शेतकऱ्यांसाठी आपचे प्रेम पुतना मावशीचेच, सत्तेवर आल्यावर 15 दिवसांतच लाठीमार

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर – कृषि कायद्याविरोधात आंदोलनाच्या वेळी आम आदमी पक्षाचे शेतकऱ्यांना असलेले प्रेम पुतना मावशीचेच होते असे स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर 15 दिवसांतच आपच्या सरकारने शेतकऱ्यांवर लाठीमार केला.AAPs love for farmers is like that of Putna’s aunt, only 15 days after came in power farmers beaten by police

    आम आदमी पार्टीच्या राजवटीत पोलिसांनी प्रथमच शेतकऱ्यांवर लाठीमार केला आहे. या घटनेत 6 शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.पंजाबमधील शेतकऱ्यांनी भारतीय किसान यूनियनच्या (एकता उग्रहां) नेतृत्वात कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन छेडले आहे.



    या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री नायब तहसीलदारांसह अन्य एका कर्मचाऱ्याला बंधक बनवले. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री 12 च्या सुमारास आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करुन ओलिसांची सुटका केली.

    या घटनेत 6 शेतकरी जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नायब तहसीलदार अरजिंदर सिंग व कर्मचाऱ्याच्या सुटकेनंतर आता संपूर्ण पंजाबमधील तहसीलदार संपावर गेलेत.शेतकऱ्यांनी लाल अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशीची भरपाई देण्यासाठी सरकारने

    मुक्तसीर जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी नायब तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका केली. पण, शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. बीकेयूने आता तहसील कार्यालयाबाहेर धरणे दिले आहे.

    AAPs love for farmers is like that of Putna’s aunt, only 15 days after came in power farmers beaten by police

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य