मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधी आघाडी इंडियाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शनिवारी राज्याची राजकीय परिस्थिती स्पष्ट करताना ते म्हणाले की, AAP पंजाबच्या सर्व 13 लोकसभेच्या जागा आणि चंदीगडच्या एका जागेवर निवडणूक लढवणार आहे. येत्या 10-15 दिवसांत या जागांसाठीचे उमेदवारही पक्ष जाहीर करेल, असेही त्यांनी जाहीर केले.AAP will field candidates for all Lok Sabha seats in Punjab
यावेळी केजरीवाल म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला. तुम्ही आम्हाला 117 पैकी 92 जागा दिल्या (विधानसभा निवडणुकीत), तुम्ही पंजाबमध्ये इतिहास घडवला. मी आणखी एक आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्याकडे हात जोडून आलो आहे. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यात होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 14 जागा आहेत – पंजाबमधील 13 आणि चंदीगडमधून एक. येत्या 10-15 दिवसांत आप या सर्व 14 जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल. या सर्व 14 जागांवर बहुमतासह आम आदमी पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील एका सभेला संबोधित करताना ही घोषणा केली आहे. गेल्या महिन्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले होते की त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 13 जागांवर निवडणूक लढवेल.
AAP will field candidates for all Lok Sabha seats in Punjab
महत्वाच्या बातम्या
- महिला – मुलांना ढाल बनवून मुस्लिमांनी रचली हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी; वाचा जखमी कर्मचाऱ्याची जबानी!!
- मिथुन चक्रवर्तींना छातीत दुखू लागल्याने केले रुग्णालयात दाखल
- EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल
- लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात CAA लागू होणार