नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता पुन्हा एकदा पंजाब खुणावू लागले आहे. शेतकरी आंदोलनावरून धुमसणाऱ्या पंजाबमध्ये आपल्या पक्षाला मोठी संधी असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आज पंजाबच्या भेटीवर जात आहेत.AAP will concentrate on Punjab
दिल्लीखालोखाल पंजाबमध्ये आपला नेहमीच मोठा पाठिंबा मिळत राहिला आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी गुजरातला भेट दिली होती. तेथे हार्धिक पटलेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. आता या जोडीला त्यांनी पंजाबवरही लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे.
केजरीवाल यांनी माजी पोलिस अधिकारी कुंवर विजयप्रताप सिंग यांना पंजाबात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याचे मनाशी ठरविले आहे. २०१५च्या कोटकपुरा पोलिस गोळीबारप्रकरणी चौकशी केलेल्या एसआयटी पथकात ते होते. पथकाचा अहवाल पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.
AAP will concentrate on Punjab
- चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे गरजेचे, सद्गुरू यांचा संदेश
- आर्थिक मदतीसाठी इम्रान खान यांचा अमेरिकेला पोकळ इशारा
- कोणत्याही व्यक्तीची माघारी टिंगल करून नका
- राममंदिरासाठीच्या देणग्यांमधून उकळला जातोय फायदा – सुरजेवाला यांची टीका
- स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय असते
- राजधानी दिल्ली आता वेगाने पूर्वपदावर, बहुतांश निर्बंध शिथील