विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर ते नवाब मलिकांसारखाच माध्यमांसमोर हात हलवत तुरुंगात दाखल झाले. AAP MP Sanjay Singh in ED custody for 5 days
दारू घोटाळ्यातले पैसे संजय सिंह यांना नेऊन दिल्याचा जबाब दिनेश अरोरा आणि अमित अरोरा यांनी दिले आणि त्या आधारावर संजय सिंह यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली. त्यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयाने 5 दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. ईडीच्या कोठडीकडे होण्यापूर्वी संजय सिंह यांनी हम डरंगे नाही लढेंगे, असे म्हणत नबाब मलिका सारखा माध्यमांकडे बघून हात हलविला.
नवाब मलिक देखील दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी केलेल्या मनी लॉन्ड्रीग घोटाळ्यात अटक झाल्यानंतर असाच हात हलवत तुरुंगात गेले होते. त्यानंतर ते तब्बल दीड वर्ष तुरुंगात राहिले. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे आणि ते घरी विश्रांती घेत आहेत गेल्या कित्येक दिवसांमध्ये त्यांचे सार्वजनिक जीवनात वावरणे थांबले आहे. इतकेच नाही, तर मराठी माध्यमांमधून त्यांचे नावही आता गायब झाले आहे.
खासदार संजय सिंह हे नबाब मलिक यांच्यासारखेच माध्यमांसमोर हात हलवत हम डरेंगे नही, लढेंगे असे म्हणत ईडीच्या कोठडीत गेले आहेत. 5 दिवसानंतर पुन्हा ईडी त्यांना राऊजत एव्हेन्यू न्यायालयात हजर करेल आणि त्यांच्या जामिनावर पुढची सुनावणी होईल. पण ते बाहेर येतीलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही.
संजय सिंह यांना दिनेश अरोरा आणि अमित अरोरा यांच्या जबाबदांच्या आधारे ईडीने अटक अटक केली या अरोरांना 1 ऑगस्टला जामीन मिळाला होता आणि त्यांनी 14 ऑगस्टला आपला जबाब बदलला. त्यामुळे संजय सिंह यांना अटक झाली, असा दावा संजय सिंह यांचे वकील सोमनाथ भारती यांनी केला आहे.
AAP MP Sanjay Singh in ED custody for 5 days
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार