वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबच्या राजकारणात आता भाजप आणि आपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कारण पंजाब सरकारने राज्यातील हुतात्मा स्मारकांवर लिहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटवले आहे. अशा परिस्थितीत भाजपने पंजाबमधील आप सरकारवर चुकीची कारवाई केल्याचा आरोप केला आहे.AAP Govt removes PM’s name from Punjab Martyrs Memorial; BJP attack
‘आप’ सरकारने दिले उत्तर
पंजाबच्या आप सरकारने भाजपच्या आरोपांना आणि प्रश्नांना उत्तर दिले आहे. हुतात्मा स्मारकांवर फक्त हुतात्म्यांचीच नावे असावीत, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे, पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, राज्य सरकारने शहिदांच्या स्मारकाच्या शिलालेखांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटवले आहे.
राज्य सरकारच्या या कृतीवर त्यांनी ठपका ठेवला आहे. येत्या काही दिवसांत या मुद्द्यावरून भाजप आणि आपमधील वाद वाढू शकतो हे स्पष्ट आहे.
AAP Govt removes PM’s name from Punjab Martyrs Memorial; BJP attack
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!