• Download App
    आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ! Aam Aadmi Party MP Sanjay Singhs judicial custody extended

    आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ!

    जाणून घ्या, आता कधीपर्यंत असणार  तुरुंगात मुक्काम

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या अडचणी  कमी होताना दिसत नाही. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सुनावणी करताना राऊस एव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. Aam Aadmi Party MP Sanjay Singhs judicial custody extended

    आज न्यायालयाने संजय सिंह यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या तीन दिवसांच्या ईडी कोठडीच्या शेवटी, त्यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिशांनी त्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारीच संजय सिंह यांनी आपल्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या वकिलाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याचा आग्रह  केल्यानंतर उच्च न्यायालयाने शुक्रवारीच संजय सिंह  यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले.

    Aam Aadmi Party MP Sanjay Singhs judicial custody extended

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : सुरुवातीला 7, नंतर 11 आणि आज 14, ठोकले कराची ते इस्लामाबाद; भारताने टप्प्याटप्प्याने उलगडली हवाई हल्ल्यांची मालिका!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    India-Pak : भारत-पाक तणावादरम्यान परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी; मे महिन्यात आतापर्यंत ₹14,167 कोटींची गुंतवणूक